Maval news: वाचनवेड संस्था, अभंग प्रतिष्ठान यांच्यातर्फे 12 शाळांना प्रेरणादायी पुस्तकांचा संच भेट

Maval news: वाचनवेड संस्था, अभंग प्रतिष्ठान यांच्यातर्फे 12 शाळांना प्रेरणादायी पुस्तकांचा संच भेट
Pckhabar- ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने वाचनवेड संस्था, पुणे यांच्या विशेष सहकार्याने व अभंग प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून मावळ तालुक्यातील कान्हे केंद्रातील 12 जिल्हा परिषद शाळांना प्रेरणादायी पुस्तकांचा संच भेट देण्यात आला.

वडगांव येथीलजि.प.प्राथमिक शाळेत गुरूवारी झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी उद्योजक सुधाकररभाऊ शेळके, गटविकास अधिकारी सुधीर भागवत, गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे, विस्ताराधिकारी वाळुंज सर, कान्हे केंद्रप्रमुख कांचनताई धोत्रे, महाराष्ट्र राज्य केंद्रप्रमुख असोसिएशनचे अध्यक्ष रामराव जगदाळे सर, विजय बावीसकर, विजय सुराणा, अभंग प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रविण काळोखे, उपाध्यक्ष सुरेश गाडे, देहू चे मा.उपसरपंच सचिन कुंभार, सागर मोरे, सागर भसे, सचिन काळोखे, अमोल काळोखे, लक्ष्मण काळोखे, विक्रम भोईटे, विकास कंद व अभंग प्रतिष्ठानचे सदस्य, कान्हे केंद्रातील शिक्षक बंधू-भगिनी आदी उपस्थित होते.

ब्राम्हणवाडी, कान्हे, जांभूळ, साते, इंद्रायणीनगर, राजपुरी, सांगवी, केशवनगर, कातवी, मोहितेवाडी, ठाकरवाडी या शाळांतील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी पुस्तकांचे संच भेट देण्यात आले.

अभंग प्रतिष्ठान व वाचन वेड या संस्थेने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना वाचनाची आवड लागावी यासाठी पर्यंत प्रेरणादायी पुस्तकांचे संच देण्याच्या या उपक्रमाचे सुधाकरभाऊ शेळके यांनी कौतुक केले. वाचनवेड संस्थेचे प्रमुख किरीटी मोरे व मयूर सेठ यांचे आभार व्यक्त केले.

वाचनाची आवड ही विद्यार्थ्यांसह, सर्व शिक्षक-पालक यांनी देखील जोपासली पाहिजे असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.

सुधीर भागवत म्हणाले ”वाचनातून चांगले विचार घडतात व चांगले विचार आदर्श नागरिक घडवत असतो यासाठी व्यक्ती केवळ सुशिक्षित असून चालणार नाही तर तो सुसंस्कृत असायला हवा”, असे विचार त्यांनी व्यक्त केले.

याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजश्री घोरपडे यांनी केले. सर्व शिक्षकांच्या वतीने सविता पवार, उषा भोईटे यांनी अभंग प्रतिष्ठानच्या वतीने प्रा.विकास कंद यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन काळडोके सर यांनी केले. तर आभार नवले सर यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *