School news: स्कूल चले हम…शहरातील विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत
Pckhabar- कोरोनामुळे गेल्या 10 महिन्यांपासून बंद असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरातील महापालिकेसह खासगी शाळेतील पाचवी ते आठवीचे वर्ग गुरूवारपासून सुरू करण्यात आले. विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.
यमुनानगर निगडी येथील मॉडर्न हायस्कुलमध्ये विद्यार्थ्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. कोरोनानंतर वर्षभराने सुरू झालेली शाळा, यामुळे विद्यार्थ्याच्या चेहर्यावर उत्साह दिसत होता. यावेळी प्रथम राष्ट्रगीत होऊन विद्यार्थ्यांच्या हस्ते गणेशाचे पूजन करण्यात आले. यानंतर ढोल ताशाच्या गजरात विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. महिला शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे औक्षण करून फुलांचा वर्षाव केला. यावेळी प्रत्येक विद्यार्थ्याला गुलाब पुष्प , पेन , रंगीबेरंगी फुगे देण्यात आले.यावेळी मुख्याध्यापक गोकुळ कांबळे यांनी विद्याथी आणि पालकांचे स्वागत केले.
शाळा समिती अध्यक्ष शरद इनामदार यांनी कोरोना बाबत घ्यायची काळजी यावर मार्गदर्शन केले. तर नगरसेवक सचिन चिखले यांनी कोरोना काळात नागरिकानी केलेल्या सहकार्याबद्दल पालकांचे आभार मानले. शाळेत येताना सोशल डीस्टसिंग, मास्क आणि सॅनिटायझर याबाबत जागरूक केले. या स्वागत कार्यक्रमास मुख्याध्यापक गोकुळ कांबळे, राजीव कुटे, पालक संघाचे उपाध्यक्ष कांतीलाल दनाने, सुगंधा रॉय, पांडुरंग मराडे, संगीता घुले उपस्थित होते.










Leave a Reply