PCMC news: महापौरांसाठी अवघ्या चार वर्षांत दुसर्‍यांदा अलिशान मोटार खरेदीचा घाट

PCMC news: महापौरांसाठी अवघ्या चार वर्षांत दुसर्‍यांदा अलिशान मोटार खरेदीचा घाट
 Pckhabar-पिंपरी चिंचवड महापालिकेच्या महापौरांसाठी 20 लाख रुपयांची नवीन अलिशान मोटार खरेदी केली जाणार आहे. 2017 मध्ये नितीन काळजे महापौर असताना नवीन मोटार खरेदी करण्यात आली होती. मात्र अवघ्या चार वर्षांत पुन्हा महापौरांसाठी नवीन मोटारीचा सत्ताधारी भाजपकडून घाट घातला जात आहे.  

स्थायी समितीची बुधवारी बैठक झाली. या बैठकीत आयत्यावेळी मोटार खरेदीच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली.  

महापालिकेतील सत्ताधारी भाजपकडून छोट्या-छोट्या कामांना सल्लागार नेमणे, विकास कामांच्या वाढीव खर्चाला मंजुरी देणे, कोरोना सारख्या जागतिक महामारीत कोट्यावधी रूपयांचा भ्रष्टाचाराचे आरोप विरोधकांकडून होऊ लागले आहेत. त्यानंतरही भाजपच्या पदाधिकार्‍यांची लुटमार, उधळपट्टी सुरूच आहे.

2017 मध्ये पिंपरी महापालिकेत सत्ता आल्यानंतर भाजपचे प्रथम महापौर नितीन काळजे यांच्यासाठी नवीन मोटार खरेदी करण्यात आली होती. मात्र, अवघ्या चार वर्षांत महापौरांसाठी पुन्हा 20 लाखांची अलिशान मोटार खरेदी करण्यात येणार आहे. यामुळे सत्ताधारी भाजपवर विरोधकांकडून जोरदार टीका होऊ लागली आहे. ही मोटार टोयाटो किर्लोस्कर मोटार प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून थेट पद्धतीने खरेदी करण्यात येणार आहे. या साठी आयत्यावेळी स्थायी समितीमध्ये सदस्यांनी प्रस्ताव ठेवला. त्याला सभापतींनी मंजुरी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *