Pimpri news: देहूरोड, खडकी, पुण्यासह देशभरातील ५६ कॅन्टोन्मेंट बोर्ड बरखास्त होणार
Pckhabar- खडकी, पुणे व देहुरोडसह देशभरातील ५६ कॅन्टोन्मेंट बोर्ड बरखास्त करण्यासंबधीचे दिल्ली संरक्षण मंत्रालयाचे आदेश सर्व कॅन्टोन्मेंट बोर्डास प्राप्त झाले आहेत. दि.११ फेब्रुवारी रोजी या आदेशाची अंमलबजावणी होणार असल्याची माहिती खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाच्या वतिने देण्यात आली.
खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डास मंगळवारी दिल्ली रक्षा संपदा विभागाचे उप संचालक राजेश कुमार साह यांच्या बोर्ड बरखास्त संदर्भातील पत्र प्राप्त झाले असल्याचे बोर्ड प्रशासनाकडुन सांगण्यात आले. खडकी, पुणे व देहुरोडसह राज्यातील ७ कॅन्टोन्मेंट तर देशभरातील ५६ कॅन्टोन्मेंट बोर्डाचा तसेच सदस्यांचा कार्यकाल दि. १० फेब्रुवारी रोजी संपुष्ठात येणार आहे. पुढील निवडणुका होईपर्यंत अध्यक्ष व सीईओ असे द्विसदस्यीय अथवा अध्यक्ष सीईओ आणि जनतेचा एक प्रतिनिधी असे त्रिसदस्यीय समिती बोर्ड पुढील निवडणुका होईपर्यंत बोर्डाचा कारभार पाहतील. जनतेचा प्रतिनिधी अर्थात उपाध्यक्ष निवड बाबत संरक्षण मंत्रालयाकडुन प्रथम सुचना प्राप्त होतील. त्यानंतर बोर्ड जनतेचा प्रतिनिधी निवड बाबत प्रस्ताव पाठवते.
मागील कॅन्टोन्मेंट निवडणुका जानेवारी २०१५ मध्ये पार पडल्या. त्याचा कार्यकाल फेब्रुवारी २०२० मध्ये संपला. निवडणुका होऊ न शकल्याने संरक्षण मंत्रालयाने ६ महिने मुदतीची दोन वेळा मुदतवाढ सर्व कॅन्टोन्मेंट बोर्डास दिली. ही मुदतवाढ दि. १० फेब्रुवारी रोजी संपणार आहे. कॅन्टोन्मेंट निवडणुका होऊ न शकल्याने संरक्षण मंत्रालयाने ११ फेब्रुवारी रोजी बोर्ड बरखास्त करण्याचे आदेश बोर्डास बजावले आहे. पुढील निवडणुका होई पर्यंत द्वि सदस्यीय अथवा त्रिसदस्यीय समिती बोर्ड कारभार पाहणार आहे.
त्रिसदस्यीय समितीतील जनतेचा प्रतिनीधी अर्थात कँन्टोन्मेंट उपाध्यक्ष पदा करीता आता पासुनच आजी माजी सदस्या सह मातब्बर राजकीय पुढाऱ्यांनी वरिष्ठ नेत्यांकडे आपली फिल्डींग लावुन ठेवली आहे.










Leave a Reply