Dehu news : जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त युथ क्लबतर्फे ‘राज्यस्तरीय काव्य’ स्पर्धा
Pckhabar- जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त युथ क्लब देहूगावतर्फे राज्यस्तरीय काव्य स्पर्धेचे 15 फेब्रुवारीला देहूगावात आयोजन करण्यात आले आहे.
श्रीक्षेत्र देहूगाव येथील वैकुंठ स्थान मंदिराशेजारी, किर्तन महोत्सव सभामंडप गोपाळपुरा येथे १५ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी १० वाजता ही स्पर्धा होणार आहे. स्पर्धेतील प्रथम विजेत्यास पाच हजार एक रूपये, द्वितीय विजेत्यास चार हजार एक रुपये, तृतीय विजेत्यास तीन हजार एक रूपये, चतुर्थ विजेत्यास दोन हजार एक रूपये, उत्तेजनार्थ एक हजार एक रूपयांची दोन बक्षिसे बक्षिसे देण्यात येणार आहेत. प्रत्येक विजेत्यास सन्मान चिन्ह तर सहभागी झालेल्या स्पर्धकास प्रमाणात देण्यात येणार आहे.
8605690594, 9075772853, 8087243849, 8087243865 या क्रमांकावर कविता व्हॉट्सअॅप कराव्यात, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी काही नियम ठेवण्यात आले आहेत, ते पुढीलप्रमाणे:
१) ११ फेब्रुवारी २०२१ या दिवसापर्यंत कविता दिलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सअॅप स्विकारल्या जातील.
२) कविता लिखित स्वरूपात असाव्यात.
३) कविता स्वरचित असावी.
4) निवडक कविता स्पर्धेच्या दिवशी सादरीकरणास पात्र ठरतील.
5) आमंत्रित कवींनी स्पर्धेच्या दिवशी ठरलेल्या वेळेत उपस्थित राहणे बंधनकारक आहे.
६) कविता सादरीकरणासाठी 4 मिनिट वेळ मिळेल.
७) बक्षिस वितरण स्पर्धा संपल्यावर त्याच ठिकाणी लगेचच संपन्न होईल.












Leave a Reply