Sangvi crime news: सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; 16 नायजेरियन तरुणींची सुटका

Sangvi crime news: सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; 16 नायजेरिया तरुणींची सुटका
Pckhabar-पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील  सामाजिक सुरक्षा पथकाने सांगवी परिसरात सुरू असलेलं एक मोठं सेक्स रॅकेट (Sex racket) उद्ध्वस्त केले आहे. या कारवाईत 16 नायजेरियन महिलांची (Nigerian women) सुटका करण्यात आली आहे.

पिंपरी चिंचवडमधील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या पिंपळे गुरव परिसरात हा प्रकार उघडकीस आला आहे. पिटा कायद्या अंतर्गत केलेल्या कारवाईत एवढ्या मोठ्या प्रमाणात परदेशी महिला आढळून आल्याची ही पहिलीच घटना आहे.

त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून छापा मारला असता 16 नायजेरियन तरुणी आढळून आल्यात. यावेळी एका नायजेरियन तरुणाला अटक करण्यात आली आहे. या  महिला भारतात कशा आणल्या गेल्या याचा सध्या पोलीस तपास करत आहे. भर लोकवस्तीत परदेशी महिलांकडून अशा प्रकारे देह विक्रीचा व्यवसाय करून घेणारा मुख्य आरोपी कोण आहे, या दृष्टीने पोलीस सखोल तपास करत आहे.