Lonavala news: जुन्या महामार्गावर लोणावळा खंडाळा दरम्यान उद्या वाहतूक राहणार बंद

 

Lonavala news: जुन्या महामार्गावर लोणावळा खंडाळा दरम्यान उद्या वाहतूक राहणार बंद
  Pckhabar-  जुन्या मुंबई पुणे महामार्गावरील वाहतुक लोणावळा ते खंडाळा दरम्यान उद्या (गुरूवार)  दुपारी 1 ते 1.30 वाजण्याच्या दरम्यान बंद राहणार असल्याची माहिती खंडाळा महामार्गच्या सहायक पोलीस निरीक्षक सुमैया बागवान यांनी दिली .

खंडाळा येथील बॅटरी हील याठिकाणी एक ट्रेलर बॅटरी हील येथील नागरी वस्तीत पडला आहे . सदरचा ट्रेलर बाहेर काढण्यासाठी या मार्गावरील वाहतूक थांबविण्यात येणार आहे . दरम्यानच्या कालावधीत लोणावळा येथुन जुन्या मार्गाने पुणे मुंबई लेन आणि बोरघाट येथून मुंबई पुणे लेन अशी दोन्ही बाजुची वाहतुक एक्सप्रेस हायवेने वळविण्यात येईल . तसेच ट्रेलर काढण्याचे काम चालु असताना 10 मिनिटाचा ब्रेक घेवुन काम थांबवुन थांबवलेली वाहतुक सोडण्यात येतील. याची सर्व वाहतुकदार , पर्यटक , प्रवासी , दुचाकीस्वार , तीन चाकी स्वार यांनी नोंद घ्यावी असे आवाहन बागवान यांनी केले आहे .