Dighi News: दिघीत शनिवारी मोफत हृदय रोग तपासणी शिबिराचे आयोजन
Pckhabar- नगरसेवक विकासभाऊ डोळस, युवा मंच व रुबी एलकेअर सर्व्हिसेस प्रा. लिमीटेड यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या शनिवारी दिघीत मोफत हृदयरोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
हे शिबीर नगरसेवक विकासभाऊ डोळस यांच्या दिघी, परांडेनगर येथील कार्यालयात दुपारी 3 ते रात्री 9 या वेळेत होणार आहे. या शिबीरात ब्लड प्रेशर, ई.सी.जी, 2 डी-इको, ॲजिओग्राफी आदींची तपासणी करण्यात येणार आहे.
या शिबीराची माहिती देताना नगरसेवक विकासभाऊ डोळस म्हणाले” गरजू व गरीब ह्रदयरोगग्रस्त रूग्नांना उपचारासाठी मदत व्हावी या उद्देशाने भाजप शहराध्यक्ष, आमदार महेशदादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीराचा जास्तीत-जास्त गरजू नागरिकांनी लाभ घ्यावा”, असे आवाहन नगरसेवक विकासभाऊ डोळस यांनी केले आहे.
या शिबीराचे आयोजन नगरसेवक विकासभाऊ डोळस आणि कुलदीप परांडे यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी ९८९०९७२६३९/ ९९२२६१४२५१ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.











Leave a Reply