Pimpri News: महापालिका पोटनिवडणुकीसाठी मतदार यादी तयार करण्याचे निवडणूक आयोगाचे आदेश
Pckhabar- कोरोनामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेतील निधन झालेल्या तीन नगरसेवकांच्या रिक्त जागेवरील पोटनिवडणुका लवकरच होणार आहेत. या निवडणुकांसाठी मतदार यादी तयार करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने महापालिकेला दिले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दत्ता साने, जावेद शेख आणि भाजपचे लक्ष्मण उंडे यांचे कोरोनामुळे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागी पोटनिवडणूक होणार आहे. भारत निवडणूक आयोगाकडून 15 जानेवारी 2021 पर्यंत अद्यावत केलेली विधानसभेची मतदार यादी वापरण्यात येणार आहे.
प्रभागनिहाय प्रारुप मतदार यादी 16 फेब्रुवारी 2021 रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. प्रारुप मतदार यादीवरील हरकती व सूचना 16 ते 23 फेब्रुवारीपर्यंत दाखल करता येणार आहेत. प्रभानिहाय अंतिम मतदार यादी 3 मार्च रोजी तर मतदान केंद्राची यादी 8 मार्च रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. अंतिम प्रभागनिहाय व मतदान केंद्रनिहाय मतदार याद्या 12 मार्च 2021 रोजी अधिप्रमाणित करुन प्रसिद्ध केल्या जाणार आहेत.










Leave a Reply