Pimpri Water News: शहरातील पाणीपुरवठा गुरुवारी, शुक्रवारी राहणार विस्कळीत
Pckhabar-रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्रातील विद्युत विषयक देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी गुरुवारी (दि.4) पाणीपुरवठ्याची यंत्रणा बंद ठेवण्यात येणार असल्याने गुरुवारी सायंकाळचा आणि शुक्रवारी (दि.5) सकाळचा पाणीपुरवठा विस्कळीत राहणार असल्याचे पिंपरी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने कळविले आहे.
पाणी पुरवठा विभागाच्या रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्रातील विद्युत विषयक देखभाल दुरुस्तीची कामे करणे, सेक्टर क्र.23 निगडी येथील जलशुध्दीकरण केंद्र विद्युत पुरवठा विषयक व पाणीपुरवठा विषयक नियमित देखभाल दुरुस्तीची आवश्यक कामे करणे. शहरातील पाणी वितरण व्यवस्थेतील दुरुस्तीची कामे हाती घेणे आवश्यक आहे. त्यासाठी गुरुवारी (दि.4) शहरातील पाणीपुरवठ्याची यंत्रणा बंद ठेवण्यात येणार आहे.
महापालिकेमार्फत गुरुवारी सकाळचा पाणीपुरवठा केला जाईल. परंतु, त्यानंतर दुरुस्तीच्या कामामुळे शहरातील सर्व भागांचा सायंकाळाचा पाणीपुरवठा होणार नाही. दुरुस्तीच्या कामासाठी पाणीपुरवठ्याची सर्व यंत्रणा बंद ठेवल्यामुळे शहरातील सर्व भागात दुस-या दिवशी म्हणजेच शुक्रवारी (दि.5) सकाळचा पाणीपुरवठा विस्कळीत राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले आहे.










Leave a Reply