Pimpri news: युवकांना शासकीय कर्ज योजनांची माहिती देण्यासाठी 15 दिवस कार्यशाळा
Pckhabar- पिंपरी-चिंचवड शहरात राष्ट्रवादी काँग्रेस, पार्थ पवार यांच्या सहकार्याने महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र आणि पिंपरी चिंचवड महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील 15 ठिकाणी युवक युवतीसाठी शासकीय कर्ज योजनांची माहिती देण्याकरिता कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या आहेत, अशी माहिती माजी महापौर व विद्यमान नगरसेविका मंगला कदम यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी नगरसेविका वैशाली काळभोर उपस्थित होत्या. या कार्यशाळा दि. 1 ते 15 फेब्रुवारी या कालावधीत होणार आहेत.
या कार्यशाळांमध्ये सहभागी होणाऱ्या लाभार्थ्यांना कर्ज मिळावे म्हणून त्यांना शक्य ते सर्व सहकार्य केले जाईल असेही त्या म्हणाल्या. यापैकी पहिली कार्यशाळा दुर्गानगर येथे सोमवारी सकाळी पार पडली. यापुढील कार्यशाळाचे वेळापत्रक पुढील प्रमाणे आहे. दि. 2 – भिकू वाघेरे वाडा, पिंपरीगाव, संपर्क- उषा वाघेरे 9822927777, दि.3 – पूर्णानगर, संपर्क- सारिका पवार 9130853907, दि. 4- संत तुकाराम नगर, संपर्क- कविता बहल 9922961520, दि.5- भोईरनगर, संपर्क- भाऊसाहेब भोईर 9860135555, दि. 6- रावेत, संपर्क- मोरेश्वर भोंडवे 9850869999, दि. 7- भोसरी, संपर्क- अनुराधा गोफणे 9850905098, दि.,8- सानेचौक, संपर्क- यश साने- 8381099699, दि. 9- तळवडे, रुपीनगर, संपर्क- पंकज भालेकर- 9822455151, दि. 10-चिंचवड, संपर्क- लाला चिंचवडे 9763163941, दि.11- आंबेडकरनगर, अजंठानगर, संपर्क- गंगा धेंडे 9272793156, दि. 13- अजमेरा कॉलनी, संपर्क- कविता खराडे, मंदाकिनी ठाकरे- 9049459595, त्रिमूर्ती हॉल, संपर्क- राजू मिसाळ 9850911011, दि. 14- संभाजीनगर, संपर्क- मंगला कदम 9822034129
कार्यशाळांचा लाभ तरुणवर्गाने घ्यावा असे आवाहन कदम यांनी यावेळी केले.










Leave a Reply