Chinchwad news: भांडवलदारांना चालना देणारे अंदाजपत्रक गरीब, मध्यमवर्गीयांच्या पदरी निराशा : गुलामअली भालदार

Chinchwad news: भांडवलदारांना चालना देणारे अंदाजपत्रक गरीब, मध्यमवर्गीयांच्या पदरी निराशा : गुलामअली भालदार
Pckhabar- केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी आज अर्थसंकल्प सादर केला, त्यात पुणे-लोणावळा लोकल वाढ, रेल्वे चौपदरीकरण, चिंचवडला जंक्शन जाहीर करावे, आकुर्डी, देहूरोड दरम्यान लोकलसेवेसाठी रावेत येथे नवीन रेल्वे स्थानक निर्माण करावे आदी मागण्यांकडे रेल्वे मंत्री, रेल्वे प्रशासन, रेल्वे बोर्डाने दुर्लक्ष करून पुणे-लोणावळादरम्यान असलेल्या 90 लाख लोकांची घोरनिराशा केली. चिंचवड प्रवासी संघाच्यावतीने तीव्र शब्दांत धिक्कार व्यक्त करण्यात येत आहे.

गेल्या काही महिन्यांपासून कोरोना प्रादुर्भावामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील उद्योजकांनी नोकर कपात केली. लोकल सेवा बंद केली, पी.एम.पी.एम.एल. सेवा नुकतीच सुरु केली तरी, पुणे, कामशेतपर्यंत ये-जा करणारे विद्यार्थी, महिला, सरकारी-निमसरकारी कर्मचारी, व्यापारी, गोरगरिबांची रस्ते मार्गाने प्रवास करणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही. लघु, मध्यम, मोठ्या उद्योग व्यवसायामध्ये हंगामी टे्रनी कामगारांच्या पगारात कपात केली. त्यामुळे घर चालविणे या कामगार नगरीत अनेक कुटूंब प्रमुखांना असह्य झाले असताना. लोकलवाढ होणे ही प्रमुख मागणी पुणे ते लोणावळादरम्यान प्रवासीयांची होती. त्यांकडे मात्र साफ दुर्लक्ष केले. दुसरीकडे पुणे-लोणावळा चौपदरीकरण रेल्वे मार्गासाठी रेल्वे प्रशासनानाने पिंपरी-चिंचवड व पुणे महानगरपालिकेकडे निधी मागितला दोन्ही पालिकेच्या सत्ताधारी पक्षाने सदर विषयाचा दप्तरी दाखल केला. त्यामुळे रेल्वे मार्गाचे कामकाज बंद अवस्थेत पडले आहे. सध्या 1982 सालापासून चार युनिट लोकल धावत आहेत. चिंचवड रेल्वेस्थानकावरून लांबपल्ल्याच्या एक्सप्रेस गाड्यांना थांबा मिळावा आदी मागणींसाठी गेल्या 25 वर्षे पाठपुरावा करत असताना रेल्वे प्रशासन दुर्लक्ष करीत आहे याचा निषेध करीत आहोत. दुसरीकडे रेल्वे विभाग लक्झरी कोच, सीट बनवून उद्या सेवेच्या नावाखाली तिकीट वाढ करून सामान्य प्रवासी व नागरीकांच्या खिशाला कात्री लावून भांडवलदारांना दिलासाच देण्याचे अंदाजपत्रक जाहीर केले आहे. पेट्रोल वाढ, डिझेल वाढ, घरगुती गॅसची सबसिटी सरकारने काढली. त्यामुळे कष्टकरी, गरीब, मध्यमवर्गीयांसाठी लोकल वाढसाठी कोणताच निर्णय झाला नाही. कोरोना काळात अनेक मुलांच्या पालकांनी फी भरलेली नाही. बससेवा आर्थिकदृष्ट्या परवडणारी नाही याचा विचार केला नाही.
चिंचवड प्रवासी संघाचे अध्यक्ष गुलामअली भालदार, सूरज आसदकर, निर्मला माने, मुकेश चुडासमा, हार्दिक जानी, नयन तन्ना, मनोहर जेठवाणी निषेध व्यक्त करीत आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *