Union Budget 2021 News: एलआयसीचे खाजगीकरण होणार! अर्थसंकल्पात काय महागले, काय स्वस्त झाले?
Pckhabar-केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज देशाचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पावर देशातील शेतकरी, नोकरदार, व्यावसायिकांसह सगळ्यांच्या नजरा होत्या. निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प सादर करताना एलआयसीचा आयपीओ आणण्याबाबत घोषणा केली आहे. एलआयसीचा आयपीओ यंदाच्या वर्षी बाजारामध्ये येईल असं सीतारमण यांनी स्पष्ट केलं आहे.
दोन बँका आणि एक आयुर्विमा कंपनीमधील निर्गुंतवणूक सरकारकडून केली जाणार आहे. एलआयसीचा आयपीओ यंदा बाजारात येणार असल्याची घोषणा निर्मला सीतारमण यांनी केली आहे. एलआयसी आणि आयडीबीआयमधील निर्गुंतवणीकरण करुन सरकार 90 हजार कोटी रुपये उभे करण्याचं उद्देश सरकारने समोर ठेवल्याचं निर्मला सीतारमण यांनी 2020चा अर्थसंकल्प सादर करताना केली होती. त्याचबरोबर इतर निर्गुंतवणूकीकरणाच्या माध्यमातून 1.2 लाख कोटी सरकार उभे करणार असल्याचंही निर्मला सीतारमण यांनी स्पष्ट केलं होतं. यासाठी सरकार बीपीसीएल, कंटेनर कॉर्परेशन ऑफ इंडिया, शिपिंग कॉर्परेशन ऑफ इंडिया अॅण्ड एअर इंडिया या कंपन्यामध्ये यंदाच्या वर्षात निर्गुंतवणूक करण्यात येणार असल्याचं अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.
आयुर्विमा क्षेत्रातील एलआयसी सध्या 100 टक्के सरकारी मालकीची कंपनी आहे. एलआयसीची प्राथमिक विक्री भारतीय भांडवली बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी प्राथमिक विक्री ठरण्याची शक्यता आहे. मागील वर्षी जूनमध्ये सरकारनं एलआयसीचा खझज आणण्यासाठी सल्लागार कंपन्या, गुंतवणूकदार बँका, वित्तीय संस्थांना 13 जुलै 2020 पर्यंत अर्ज करण्याबाबत म्हटलं होतं. हे अर्ज ङखउ च्या प्रस्तावित आयपीओ च्या प्रक्रियेत सल्ला देण्यासाठी मागवले होते. एलआयसीसाठी गुंतवणूक आणि लोक परिसंपत्ती प्रबंधन विभागाच्या मदतीनं दोन सल्लागार नेमण्याचा प्रस्ताव देखील होता. मागील वर्षीच ऑगस्ट महिन्यामध्ये एलआयसीमधील निर्गुंतवणूक करण्यासाठी विक्रीपूर्व सल्लागार म्हणून एसबीआय कॅप्स आणि डेलॉइट यांची सरकारने नेमणूक केली आहे. एलआयसीचा आयपीओ आल्यानं सरकारच्या गुंतवणूक कार्यक्रमांना गती मिळेल, असा दावा केला जात आहे.
अर्थसंकल्पात सर्वसामन्यांसाठी काय स्वस्त आणि काय महाग झालं?
अर्थमंत्र्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणादरम्यान दोन गोष्टींचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या जीवनावर होतो. पहिला आयकर स्लॅबबाबत बजेटची घोषणा आणि बजेटमुळे काय स्वस्त आणि महाग झालं आहे.
यंदाच्या बजेटमध्ये काय स्वस्त आणि काय महाग झाले ?
1) मोबाईल फोन आणि मोबाइल फोनचे भाग, चार्जर्स.
2) गाड्याचे स्पेअर पार्ट्स
3) इलेक्ट्रॉनिक उपकरणे
4) इम्पोर्टेड कपडे
5) सोलार इन्व्हर्टर, सौर उपकरणे
6) कापूस
काय स्वस्त झालं?
1) पोलादी वस्तू
2)सोने
3) चांदी
4) तांबे साहित्य
5) लेदरच्या वस्तू
अर्थसंकल्पातील महत्वाचे मुद्दे –
1) यावरषी 2 लाख 32 हजार कोटी रुपयांचं आरोग्य बजेट.
2) पंतप्रधान आत्मनिर्भर स्वस्थ भारत योजनेसाठी 64 हजार कोटी रुपयांची तरतूद.
3) वेगवेगळ्या नव्या आरोग्य आणि कल्याण योजनांसाठी 64 हजार कोटी रुपयांची तरतूद.
4) कोविड लसीकरणासाठी 35 हजार कोटींची तरतूद.
5) डीएफआयसाठी 3 वर्षांकरता 2 लाख कोटींची तरतूद.
6) देशभरात 7 मेगा इन्व्हेस्टमेंट पार्क उभारणार
7) 15 वर्ष जुन्या वाहनांसाठी स्क्रॅपिंग पॉलिसी.
8) कचर्याची विल्हेवाट लावण्यासाठी 1 लाख 78 हजार कोटींचा निधी.
9) दुसर्या आणि तिसर्या श्रेणीच्या शहरांमध्ये गॅस पाईपलाईनचा विस्तार करणार.
10) मुंबई-कन्याकुमारी महामार्गासाठी 64 हजार कोटींचा निधी.
11) रेल्वेसाठी 1 लाख 10 हजार 55 कोटींचा विक्रमी निधी.
12) मेट्रो शहरात मेट्रो रेल्वेचं जाळं उभारणार.
13) नाशिक मेट्रोसाठी 2 लाख कोटी तर नागपूर मेट्रोसाठी 5 हजार 976 कोटी रुपयांची तरतूद.
14) सार्वजनिक वाहतुकीतल्या बसेसची सुधारणा करण्यासाठी 18 हजार कोटी.
विधानसभा निवडणुका असलेल्या राज्यांसाठी मोठ्या घोषणा.
15) केरळ, तमिळनाडू, आसाम, पश्चिम बंगालवर योजनांची खैरात.
16) मोठ्या कंपन्यांच्या निर्गुंतवणुकीतून 1 लाख 75 हजार कोटी रुपयांचा निधी उभारणार.
17) सरकारी बँकांसाठी 20 हजार कोटी रुपयांची गुतवणूक.
18) गहू उत्पादक शेतकर्यांसाठी 75 हजार 60 कोटी रुपयांच्या मदतीची तरतूद.
19) शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या घोषणा.
20) विमा क्षेत्रात परदेशी गुंतवणूक मर्यादा 49 वरुन 74 टक्क्यांवर.
21) अर्थसंकल्प वाचन सुरु असताना शेअर बाजारात उसळली.
22) यावर्षी एलआयसीचा आयपीओ बाजारात येणार.
23) केरळमध्ये राष्ट्रीय महामार्गासाठी 65 हजार कोटींची तरतूद.
24) पश्चिम बंगालमध्ये कोलकाता-सिलीगुडी राष्ट्रीय महामार्गाची घोषणा.
25) लहान सिंचन प्रकल्पासाठी 5 हजार कोटी रुपयांची तरतूद.










Leave a Reply