Pimpri news: फिनेल पिऊन विवाहित महिलेने सहाव्या मजल्यावरून मारली उडी; नातेवाईकांची रूग्णालयातच हाणामारी

Pimpri news: फिनेल पिऊन विवाहित महिलेने सहाव्या मजल्यावरून मारली उडी; नातेवाईकांची रूग्णालयातच हाणामारी
Pckhabar-फिनेल पिऊन विवाहित महिलेने राहत्या घराच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. चिखलीत आज सकाळी ही घटना घडली.

दरम्यान, जखमी महिलेला उपचारासाठी वायसीएम रूग्णालयात आणले. त्यानंतर महिलेच्या सासर व माहेरच्या लोकांमध्ये वायसीएम रुग्णालया समोरच हाणामारी झाली. यात आठ ते दहा जण किरकोळ दखमी झाले. पोलीस आणि दंगा नियंत्रक पथकाला पाचारण करण्यात आल्यानंतर वाद नियंत्रणात आला.

रूपाली पाचंगे (वय 20) असे आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या महिलेचं नाव आहे. महिलेची प्रकृती स्थिर असून तिला पुढील उपचारासाठी अतिदक्षता विभागात हलवण्यात येणार असल्याचे वायसीएमच्या प्रमुख वैद्यकिय अधिका-यांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रूपाली पाचंगे या महिलेने फिनेल पिऊन राहत्या घराच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारली. ही महिला कच-याच्या गाडीत पडली. उपचारासाठी तिला तात्काळ पिंपरीतील यशवंतराव चव्हाण (वायसीएम) रूग्णालयात हलवण्यात आले.

उपचार सुरू असताना महिलेच्या सासर व माहेरच्या लोकांमध्ये वायसीएम समोर भांडण झाले. भांडण वाढत गेले आणि दोन गटात जोरदार हाणामारी झाली. या हाणामारीत आठ ते दहा जण किरकोळ जखमी झाले. दंगा वाढत चालल्याने पोलिसांना पाचारण करण्यात आले. काही काळासाठी रूग्णालय परिसरातील वातावरण तणावपूर्ण झाले होते.