Chinchwad news: गटबाजीमुळे शिवसेनेचे वाटोळे – रवींद्र मिर्लेकर

Chinchwad news: गटबाजीमुळे शिवसेनेचे वाटोळे – रवींद्र मिर्लेकर

Pckhabar- पिंपरी-चिंचवड शहरातील गटबाजीने शहर शिवसेना लयाला गेली आहे. शिवसेनेचे वाटोळे झाले आहे, असा संताप शिवसेना उपनेते रवींद्र मिर्लेकर यांनी व्यक्त केला.

शिवसेनेने आगामी महापालिका निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. त्याअंतर्गत मेळावे घेतले जात आहेत. मिशन ‘2022’ अंतर्गत भोसरी विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिकांचा आज (शनिवारी) शाहुनगर येथे मेळावा झाला. यावेळी मिर्लेकर बोलत होते. माजी खासदार शिवाजीराव आढळराव, संपर्कप्रमुख बाळा कदम, शहरप्रमुख योगेश बाबर, खेडचे सहसंपर्क प्रमुख इरफान सय्यद, उपजिल्हाप्रमुख नीलेश मुटके, शिवसेना महिला आघाडीच्या शिरूरच्या जिल्हासंघटक सुलभा उबाळे आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.  

मिर्लेकर म्हणाले, शिवसेनेचा जन्म लढ्यातून झाला आहे. शिवसेनेला प्रशासन चळाचळा कापायचे. आता आपण सत्तेत आहोत. तरी, अजूनही अनेक ठिकाणी प्रशासनाला वाटते की हे औटघटकेचे राजे आहेत. अशा भाजपधार्जिनी प्रशासनाला तुम्ही बेजार करून सोडा.

शिवसैनिकांचा फक्त एकच गट. तो म्हणजे बाळासाहेबांचा, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा गट होय. नेतृत्वाशी आपली बांधीलकी असली पाहिजे. मेळाव्याच्या फलकावर शहरप्रमुखाचा फोटो नाही, असे का व्हावे. यातुनच गटबाजी दिसून येते. येत्या महापालिका निवडणुकीत यश मिळवायचे असेल तर हे चित्र बदलायला हवे. सर्वांनी एकदिलाने काम करायला हवे. गटबाजी, मतभेद मोडीत काढा, असेही ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *