Chinchwad news: पुणे जिल्ह्यात आपले सरकार नाही, खरी लढाई राष्ट्रवादी सोबतच – शिवाजीराव आढळराव
Pckhabar- महाविकास आघाडी झाली असली. राज्यात आपले सरकार आहे. तरी, पुणे जिल्ह्यात आपले सरकार नाही. जिल्ह्यात आपली खरी लढाई राष्ट्रवादी काँग्रेस सोबतच असल्याचे शिवसेनेचे शिरूरचे माजी खासदार आणि उपनेते शिवाजीराव अढळराव यांनी सांगितले.
‘मिशन 2022’ अंतर्गत भोसरी विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिकांचा आज (शनिवारी) शाहुनगर येथे मेळावा झाला. त्यावेळी ते बोलत होते. शिवसेना मिर्लेकर यांनी शिवसेनेच्या गटबाजीवर जाहीर भाष्य केले. शिवसेना उपनेते रवींद्र मिर्लेकर, संपर्कप्रमुख बाळा कदम, शहरप्रमुख योगेश बाबर, खेडचे सहसंपर्क प्रमुख इरफान सय्यद, उपजिल्हाप्रमुख नीलेश मुटके, शिवसेना महिला आघाडीच्या शिरूरच्या जिल्हासंघटक सुलभा उबाळे आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
शिवाजीराव आढळराव म्हणाले, राज्यात सत्ता आहे. या भ्रमात राहू नका, संघर्ष आपल्या पाचवीलाच पुजला आहे. पुढच्या लोकसभा निवडणुकीत मला कोणाचा प्रचार करावा लागतोय हे माहीत नाही. मी देखील रामभरोसे आहे.
महापालिकेची आगामी निवडणूक वर्षावर आली आहे. त्यामुळे आता स्वस्थ बसून चालणार नाही. त्वेषाने लढले पाहिजे. भोसरीत शिवसेनेचे वर्चस्व स्थापन करावे, असेही ते म्हणाले.










Leave a Reply