Maharashtra news : पद्मश्री गिरीश प्रभुणे यांना आलेल्या मालमत्ता जप्तीची नोटीसबाबत तात्काळ तोडगा काढा: उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांचे निर्देश

Maharashtra news : पद्मश्री गिरीश प्रभुणे यांना आलेल्या मालमत्ता जप्तीची नोटीसबाबत तात्काळ तोडगा काढा: उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांचे निर्देश

Pckhabar-पद्मश्री गिरीश प्रभुणे यांना आलेल्या मालमत्ता जप्तीची नोटीसबाबत पिंपरी चिंचवड मनपा आयुक्ताने तात्काळ तोडगा काढण्याचे निर्देश महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी दिले आहेत.

केंद्र सरकारच्या पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या सामाजिक कार्यकर्ते गिरीश प्रभुणे यांना पिंपरी चिंडवड महापालिकेने मालमत्ता कराची नोटीस पाठवली आहे अशी माहिती मिळाली. यात २००० चौरस फुटाच्या पूढे श्री प्रभुणे यांच्या संस्थेचे बांधकाम असल्याने त्यांना मालमत्ता कर हा शासनाच्या नियमाप्रमाणे दुपटीने लागला आहे. सदर शैक्षणिक ही खूप जुनी असल्याने नवीन नियमाप्रमाणे ब्लु लाईनच्या आत आली आहे असे असल्याने सदर संस्थेचे बांधकाम अधिकृत होऊ शकत नाही. पुनरुत्थान समरसता गुरुकुलम या श्री.गिरीश प्रभुणे यांच्या संस्थेला महापालिकेची मालमत्ता कर भरण्यासंबंधी नोटीस आली आहे. रुपये 1 कोटी 83 लाख मालमत्ता कर भरण्याची ही नोटीस आहे. 21 जानेवारी २१ महापालिकेडून ही नोटीस पाठवण्यात आली होती आणि त्यानंतर 25 जानेवारीला प्रभुणे यांना पद्मश्री जाहीर झाला होता.

याबाबत आपणास निर्देश देते की, श्री प्रभुणे हे समाजहिताचे आणि समाजप्रबोधनाचे काम करत आहेत असे असताना प्रभुणे यांच्या संस्थेला जप्तीची नोटीस काढली आहे याबद्दल मी खेद व्यक्त करते. नोटीस काढण्या अगोदर श्री.प्रभुणेना भेटून घेऊन अधिकारी यांची भेट घेऊन तोडगा काढला असता तर विनाकारण मनपा विरोधात वाद निर्माण झाला नसता असे मला वाटते. याघटनेत तात्काळ तोडगा काढण्याचे निर्देश मी आपणास सदर पत्राच्या माध्यमातून देत आहे. तसेच शैक्षणिक कार्य असल्याने श्री प्रभुणे यांच्या संस्थेची फाईल शैक्षणिक समितीकडे पाठवून कर कमी करता येईल का याचा विचार करावा.

त्याचप्रमाणे संस्थेचे बांधकाम करताना त्याठिकाणी ब्लु लाईन क्षेत्र नव्हते त्यामुळे परत पूर परिस्थिती निर्माण झाल्यानंतर ब्लु लाईन वाढविण्यात आली आहे. त्यामुळे ब्लु लाईन मधील बांधकाम अधिकृत होत नाहीत परंतु शासनाने सदरील संस्थेचा विचार खास बाब करण्याची सूचना देखील राज्य शासनाला करत आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *