Pimpri News: ‘सात दिवसात कर भरा अन्यथा मालमत्ता सील’, पद्मश्री पुरस्कारप्राप्त गिरीश प्रभुणे यांच्या संस्थेला पालिकेची नोटीस
Pckhabar- पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेल्या गिरीश प्रभुणे यांच्या क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती संचालित पुनरुत्थान समरसता गुरुकुलम संस्थेला महापालिकेने मालमत्ता कर थकविल्याची नोटीस दिली आहे. सात दिवसांच्या आत थकबाकी भरावी. अन्यथा मालमत्ता सील करण्याचा इशारा दिला आहे.
क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती संचालित पुनरुत्थान समरसता गुरुकुलम या संस्थेला देखील नोटीस दिली आहे. त्यांच्याकडे 1 कोटी 83 लाखांची थकबाकी आहे. त्यांच्यासह 25 लाखांच्या पुढील थकबाकीदारांना नोटीसा दिल्या आहेत.
दरम्यान, पिंपरी-चिंचवड शहरात आजमितीला पाच लाख 27 हजार 338 मालमत्ता आहेत. त्यामध्ये निवासी चार लाख 47 हजार 8, बिगरनिवासी 46 हजार 828, औद्योगिक तीन हजार 700, मोकळ्या जागा आठ हजार 781, मिश्र 15 हजार 819 आणि इतर पाच हजार 202 मालमत्ता आहेत. या मालमत्तांना महापालिकेकडून कर आकारणी केली जाते.










Leave a Reply