Talegaon Dabhade news: ‘गिफ्ट घेण्याची संस्कृती जनसेवा समितीमध्ये नाही’ : किशोर आवारे
Pckhabar- विषय समिती सभापतीपदाच्या निवडीवरून तळेगाव नगरपरिषदेमध्ये वाद सुरू झाला आहे. दोन गटात पत्रकवार सुरू झाले आहे. रात्री आठनंतर गिफ्ट घेण्याची संस्कृती जनसेवा विकास समितीमध्ये नाही. राज्यस्तरीय नेतृत्व करणाऱ्या युवा नेत्याला स्थानिक दोन-चार वॉर्डमध्ये असणाऱ्या जनसेवा विकास समितीबद्दल पत्रक काढावे लागते, म्हणजे कदाचित त्यांना उपनगराध्यपदाच्या निवडणुकीत आलेल्या नैराश्यातून असे पत्रक काढले असेल असे वाटते, अशी खरमरीत टीका जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर आवारे यांनी केली आहे.
प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, तळेगाव शहरातील राज्यस्तरीय युवा नेत्याने पत्रकाच्या माध्यमातूनजनसेवा विकास समितीवर जी टीका केली आहे, त्याचे सर्वप्रथम जनसेवा विकास समिती खंडन करीत आहे.२८ जानेवारीच्या विषय समितीच्या निवडणुकीत युवा नेत्याने रात्री आठनंतर निर्णय घेणाऱ्याचे गणित ऐकून, पाच-एक-एकच्या फॉर्म्युल्याचा हिशोब मांडला.
पण प्रत्यक्ष सभागृहात सभापती निवडीच्या वेळेस कोणाचे किती नगरसेवक हजर होते याची माहिती नसावी. यांना स्थानिक राजकारणाची काळजी होती, तर त्यांनी त्यांच्या गटनेते व शहराध्यक्षांशी चर्चा करून मगच पत्रक काढावयास हवे होते.
तळेगाव नगर परिषदेच्या विषय समितीच्या निवडीवरून राष्ट्रवादी माहिती कदाचित या युवा नेत्याला युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष व तळेगाव शहर सुधारणा व विकास समितीचे नगरसेवक संतोष भेगडे यांनी पत्रक काढून जनसेवा विकास समितीवर आरोप केले होते.
दरम्यान, विषय समिती सभापती निवडीवरून झालेला हा वाद म्हणजे आगामी निवडणुकीची नांदीच म्हणावी लागेल. येत्या वर्षाअखेर नगरपालिकेची निवडणूक होणे अपेक्षित आहे. त्यामुळे येत्या काळात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडणार हे मात्र निश्चित!










Leave a Reply