Dehu news: ‘जीवन जगण्याचा सत्यशील मार्ग महात्मा गांधींनी दाखवून दिला’: डाॅ.दिलीप गरुड
Pckhabar- ”जीवनामध्ये सत्य हाच परमेश्वर व परमेश्वर हेच सत्य याच विचाराने महात्मा गांधींनी आपल्या जीवनातील सर्वांच्या कल्याणाचा विचार ठेवून सत्याचे प्रयोग केले. जीवन जगण्याचा सत्यशील मार्ग सर्वांना दाखवून दिला”, असे प्रतिपादन साने गुरुजी संस्कार साधनाचे संचालक डाॅ.दिलीप गरुड यांनी केले.

अभंग प्रतिष्ठानच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश सर्वोदय मंडळ यांच्या विशेष मार्गदर्शनाने महात्मा गांधीजींच्या पुण्यतिथीनिमित्त आज शनिवारी संत तुकाराम विद्यालय, श्रीक्षेत्र देहू येथे “महात्मा गांधी काल आज आणि उद्या” या विषयावर साने गुरुजी संस्कार साधनाचे संचालक डाॅ.
दिलीप गरुड व महाराष्ट्र ग्रामदान बोर्डाचे अध्यक्ष जयवंत मठकर यांचे व्याख्यान संपन्न झाले. यावेळी डॉ. गरूड बोलत होते. याप्रसंगी गांधीवादी विचारवंत चंद्रकांत निवंगुणे, प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रमुख डॉ.किशोर यादव, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. वडाळकर मॅडम, श्री.मोरे सर, सौ.विद्या गोरूडे,सौ.पाटील, उपसरपंच सचिन कुंभार, देहू तंटामुक्तीचे अध्यक्ष देविदास बापू हगवणे, मावळ तालुका युवक काँग्रेसचे नेते श्रीकांत मोरे, वि.वि. का. सोसायटीचे व्हा. चेअरमन तात्यासाहेब पचपिंड, अभंग प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष सुरेश गाडे व अभंग प्रतिष्ठानचे सदस्य, विद्यालयातील शिक्षक वृंद, विद्यार्थी उपस्थित होते.
डॉ. गरूड पुढे म्हणाले”महात्मा गांधीजींचा विचार हा केवळ बोलण्यासाठी नसून तो जीवन जगण्यासाठी आहे. त्यांच्या विचारांची आपल्या जीवनात प्रत्येकाने केल्यास आपले जीवन समृद्ध झाल्याशिवाय राहणार नाही”.
अभंग प्रतिष्ठानच्या माध्यमातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.










Leave a Reply