Maval news : मावळात ‘फिरते पशुवैद्यकिय वाहन’ सेवा सुरू

Maval news : मावळात ‘फिरते पशुवैद्यकिय वाहन’ सेवा सुरू

Pckhabar- पशुपालकांच्या दारापर्यंत पशुआरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासन पशुसंवर्धन विभागा अंतर्गत मुख्यमंत्री पशुस्वास्थ योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत मावळ तालुक्यासाठी औषधे व आधुनिक उपकरणांनी सुसज्ज ‘फिरते पशुवैद्यकिय वाहन’ उपलब्ध झाले आहे. या योजनेचा आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत प्रारंभ झाला.

फिरते पशुवैद्यकीय वाहन व सद्यस्थितीत कार्यरत असलेले पशुवैद्यकीय दवाखाने यांचा समन्वय ठेवून कमीत कमी वेळात आवश्यक पशुवैद्यकीय सेवा यामुळे उपलब्ध होणार आहे.
अनेकदा पशुवैद्यकीय सेवेअभावी पशुधन दगावले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. शेतीपूरक व्यवसाय म्हणून पशुधनाची क्षमता वाढविण्यासाठी त्यांचे आरोग्य उत्तम असणे गरजेचे आहे व त्याकरिता योग्य दर्जाच्या पशुवैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. याचा विचार करता हे वाहन मावळ तालुक्यातील पशुआरोग्य सेवेसाठी महत्त्वाचे ठरणार आहे.

मावळ तालुक्याकरिता हे वाहन उपलब्ध व्हावे यासाठी आमदार शेळके यांचे सहकारी सचिन वामन यांनी पाठपुरावा केला होता. त्यामुळे वामन यांच्या हस्ते श्रीफळ फोडण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *