Sangvi crime news: जुन्या भांडणातून तरूणाला खल्लास करण्याची धमकी

Sangvi crime news: जुन्या भांडणातून तरूणाला खल्लास करण्याची धमकी
Pckhabar-जुन्या भांडणातून तरूणाला शिवीगाळ करत ’तुला खल्लासच करतो, आता कुठे जाशील’ अशी धमकी देत घाबरून पळून जाणार्‍या तरूणावर दोघांनी कोयत्याने वार केले. खाली पडलेल्या तरूणाला लाथाबुक्यांनी मारहाण करून जखमी केले. ही घटना नवी सांगवी येथे घडली.
सुमित कांबळे, अभय मोरे (दोघे रा. क्रांती चौक, नवी सांगवी) असे आरोपींची नावे आहेत. त्यांच्यावर सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुजल मोगल असे जखमी झालेल्या तरूणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याचा भाऊ चिन्मय कैलास मोगल (वय-19, रा. नवी सांगवी) याने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि सुजल यांच्यात पुर्वी भांडण झाले होते. नवी सांगवीतील क्रांती चौकात सुजल आणि त्याचा मित्र बसले होते. त्यावेळी तेथे आलेल्या आरोपींनी सुजलला शिवीगाळ करत ’तुला खल्लासच करतो, आता कुठे जाशील’ अशी धमकी देत पाठीवर कोयत्याने वार केले. तसेच खाली पडल्यानंतर सुजलला लाथाबुक्यांनी मारहाण करून गंभीर जखमी केले. सांगवी पोलीस तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *