PCMC News: सेवानिवृत्त कर्मचार्‍यांचे सोमवारी लाक्षणिक उपोषण

PCMC News: सेवानिवृत्त कर्मचार्‍यांचे सोमवारी लाक्षणिक उपोषण
Pckhabar- पिंपरी-चिंचवड महापालिकेचे सेवानिवृत्त कर्मचारी सोमवारी पिंपरी येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ एक दिवस लाक्षणिक उपोषण करणार आहेत. महापालिका सेवानिवृत्त कर्मचारी असोसिएशनचे अध्यक्ष शिवाजी तापकीर आणि सचिव दत्तात्रय फुगे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.

  सेवानिवृत्त कर्मचार्‍यांना सन 2016 ते 2020 या काळातील सातव्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम देणे लागत आहे. ही रक्कम दिवाळीपूर्वी मिळावी म्हणून असोसिएशनने पालिका आयुक्त, महापौर, स्थायी समितीचे सभापती, विरोधी पक्षनेते आणि शहरातील तीनही आमदारांना पत्राद्वारे विनंती केली होती. मात्र, त्याची दखल घेतली गेली नाही.
कोरोना काळात यामुळे सेवानिवृत्तावर आर्थिक अडचणीचे प्रसंग आले. या बाबतीत असोसिएशनने वारंवार पत्रव्यवहार करूनही आयुक्तांनी पदवीधर निवडणुकीचे कारण पुढे करून वेळ मारून नेली. अखेरीस डिसेंबर 2020 मध्ये फरकाच्या रकमेचे 2 हप्ते देण्याचे जाहीर केले. मात्र, प्रत्यक्षात ते दिलेच नाहीत. याचा निषेध व्यक्त करण्यासाठी हे उपोषण केले जाणार असल्याचे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *