Talegaon Dabhade news: सार्वजनिक बांधकाम समिती सभापतीपदी निखिल भगत यांची बिनविरोध निवड
Pckhabar- तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या विशेष समित्यांच्या निवडणुकीमध्ये जनसेवा विकास समितीचे नगरसेवक निखिल उल्हास भगत यांची सार्वजनिक बांधकाम समिती सभापतीपदी बिनविरोध निवड करण्यात आली.
तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या विविध विषय समित्यांची आज गुरूवारी निवडणूक झाली. यामध्ये जनसेवा विकास समितीचे नगरसेवक निखिल उल्हास भगत यांची सार्वजनिक बांधकाम समिती सभापतीपदी, सार्वजनिक शिक्षण व क्रीडा मंडळ सभापतीपदी अनिता अनिल पवार यांची तर महिला व बालविकास कल्याण समिती सभापतीपदी हेमलता चंद्रभान खळदे यांची बिनविरोध निवड झाली.
मावळचे तहसीलदार मधुसुदन बर्गे यांनी पीठासीन अधिकारी म्हणून कामकाज पाहिले.










Leave a Reply