Pune news: 400 आयुर्वेदिक आणि औषधी वनस्पतींचे वृक्षारोपण

Pckhabar- लायन्स इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3234 डी 2 च्या ड्रिम प्रोजेक्ट “देवराई” च्या अनुषंगाने शासकीय बहुउद्देशीय दिव्यांग संमिश्र केंद्र, येरवडा येथे लायन्स क्लब ऑफ पुना निगडी आणि महाराष्ट्र शासनाच्या यांच्या सहकार्याने अर्ध्या एकराच्या क्षेत्रात देवराई प्रकल्पा अंतर्गत 400 आयुर्वेदिक आणि औषधी वनस्पतींचे वृक्षारोपण करण्यात आले.
झोन चेअरपर्सन एम जे एफ लायन दिलीपसिंह मोहिते, यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला.
याप्रसंगी प्रांतपाल लायन अभय शास्त्री, उपप्रांतपाल लायन हेमंत नाईक, महाराष्ट्र शासनाच्या वतीने समाज कल्याण विभागाचे उपायुक्त शेळके साहेब, समाज कल्याण अधिकारी प्रविण कोरगोंटीवार, आर सी एम जे एफ लायन सुदाम मोरे, आर सी मनोज बळगट, आर सी लायन मुरलीधर साठे, गॅट कोऑर्डिनेटर लायन विजय सारडा, डिस्ट्रिक्ट देवराई प्रकल्पाचे प्रमुख लायन रघुनाथ ढोले, केंद्र प्रमुख वाघ मॅडम, लायन्स निगडीचे अध्यक्ष लायन मारुती मुसमाडे, सेक्रेटरी लायन दुर्गा शंकर बेहराजी आणि लायन रामकृष्ण मंत्रीजी तसेच विविध क्लबचे अध्यक्ष उपस्थित होते.










Leave a Reply