Dehu news: कट्टा मित्र मंडळ आयोजित चित्रकला स्पर्धेत आम्रपाली चव्हाण प्रथम
Pckhabar- कट्टा मित्र मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या भव्य चित्रकला स्पर्धेमध्ये आम्रपाली हरीश चव्हाण व परिवार यांनी प्रथम क्रमांक मिळवला.

“एक कुटुंब एक चित्र”या संकल्पनेला उत्स्फूर्त प्रतिसाद देत या स्पर्धेत 550 कुटुंबांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. 550 चित्र यावेळी जमा झाली.
या स्पर्धेत एकूण 25 बक्षिसे देण्यात आली. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ अतिशय आनंद व उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रम प्रसंगी देहूतील प्रसिद्ध चित्रकार विश्वकर्मा चव्हाण, सुहास झेंडे ,सुनील हुंडारे, प्रेम माने, शिवराज हागवणे, संन्मेश पांडे, सचिन कुंभार हे चित्रकार प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले होते. या सर्व चित्रकारांचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आला.
चित्रकला स्पर्धेचे हे 15 वे वर्ष होते. यावेळी सर्व स्पर्धकांनी या आगळ्यावेगळ्या संकल्पनेचे विशेष कौतुक करून कोरोनाच्या काळातही या स्पर्धेमध्ये खंड पडला नाही, यासाठी मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांचे विशेष धन्यवाद व्यक्त केले.










Leave a Reply