Pimpri news: अरूण पवार यांचा ‘शांतीदूत सेवारत्न’ पुरस्काराने सन्मान

Pimpri news: अरूण पवार यांचा ‘शांतीदूत सेवारत्न’ पुरस्काराने सन्मान

Pckhabar-प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून शांतीदूत परिवाराच्या वतीने मराठवाडा जन विकास संघाचे संस्थापक अध्यक्ष अरूण पवार यांचा ‘शांतीदूत सेवारत्न’ पुरस्काराने गौरविण्यात आले.

हा सन्मान वायरलेस ग्रामिणचे डीआयजी मा. राजेंद्र डहाळे तसेच सायबर क्राईम डीसीपी भाग्यश्री नवटके यांच्या हस्ते पवार यांना प्रदान करण्यात आला. याप्रसंगी शांतीदूत परिवाराचे सर्वेसर्वा विशेष पोलिस महानिरीक्षक विठ्ठलराव जाधव, विद्याताई जाधव, प्रमुख पाहुणे म्हणून साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.

पुरस्काराला उत्तर देताना मराठवाडा जन विकास संघाचे संस्थापक अध्यक्ष अरूण पवार म्हणाले” पुरस्कार मिळाल्यानंतर सामाजिक क्षेत्रात काम करताना एक नवी ऊर्जा मिळते. मला या पुरस्काराने सन्मानित केल्याबदल शांतीदूत परिवाराचे आपण मनापासून आभारी आहोत”.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *