Pimpri news: सहायक पोलिस आयुक्त गणेश बिरादार यांच्यावर कायदेशीर कारवाई करा – सतीश काळे
Pckhabar-सहाय्यक पोलिस आयुक्त गणेश बिरादार यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष सतीश काळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली. अर्वाच्च व उर्मट भाषा वापरून कोडुंन ठेवून जबरदस्तीने दबाव टाकून धमकावले. तसेच अपमानास्पद वागणूक दिली. तसेच खोट्या गुन्ह्यात अडकवुन एक वर्ष जेल मध्ये पाठविण्याची धमकीही दिली असल्याचा आरोप या वेळी काळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला.
काळे यांनी प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे की,मी गेल्या एक वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी केल्याप्रकरणी श्री श्री रविशंकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, या मागणीसाठी राज्य सरकार व स्थानिक पोलिस यंत्रणेशी पत्रव्यवहार व आंदोलनाच्या माध्यमातून पाठपुरावा करीत आहे. मात्र हे आंदोलन थांबविण्यासाठी पोलिस प्रशासन दबाव आणत असल्याचा आरोप काळे यांनी केला. शुक्रवार (दि. 22) सकाळी 11 वाजता
मला वाकड विभागाच्या एलआयबी पोलीस कर्मचाऱ्यांचा दुरध्वनी वरून फोन आला असता. दुपारी 3 वाजता वाकड पोलिस स्टेशन येथे साहेबांनी भेटायला बोलावले असल्याचा निरोप आला. त्यानुसार मी दुपारी साडेतीन वाजता वाकड पोलिस स्टेशन येथे वरीष्ठ पोलिस निरीक्षक डॉ विवेक मुगळीकर यांच्या कॅबेनमध्ये गेलो व चर्चा चालू असतानाच त्या ठिकाणी सहायक पोलिस आयुक्त गणेश बिरादार आले. त्यांनी मोबाईल काढून घेतला. मोठ्या आवाजाने बोलण्यास सुरुवात केली. काय रे तुला एकदा सांगितलेलं समजत नाही का? काय ते शिवाजी च घेऊन बसलास, असे अनेक राजे होऊन गेले. “हरमखोर” तुला काय इतिहास माहित आहे का ? आदी उर्मट भाषेचा वापर केला. तसेच त्या व्हिडिओ मध्ये शिवाजी महाराजांची बदनामी झालेली नाही. त्यामुळे गुन्हा दाखल होऊ शकत नाही. तु का आत्मबलिदान करणार आहेस ? असा सवाल करत 151/3 ची कारवाई कण्याची भीती घातली अशी माहिती काळे यांनी दिली. तसेच 28 दिवसासाठी येरवडा जेलला पाठवतो. परत आल्यावर तुला 1 वर्षासाठी जेलला पाठवतो, अशी देखील भीती बिरादार यांनी घातली. तसेच ही कारवाई टाळायची असल्यास मी पुढे या विषयावर आंदोलन करणार नसल्याचा जबरदस्तीने व्हिडीओ बनविण्यास सांगितले. तसेच पोलिसांच्या नादाला लागू नको. तुझ्या दुकानासमोर नो पार्किंगचे बोर्ड लावू, तुला एखाद्या गुन्ह्यात अडकवु अशी भीती घातली. त्यानंतर आंदोलन स्थगित करत असल्याचा जबरदस्तीने व्हिडिओ बनविल्यानंतर पोलिस स्टेशनमधून रात्री साडेआठ वाजता सोडले.
बिरादार हे एक वरिष्ठ पोलीस अधिकारी असून त्यांनी माझ्या विरोधात वापरलेली भाषा ही अत्यंत उर्मट व आर्वच्च होती. तसेच त्यांनी कोडुंन ठेवून माझ्यावर दबाव टाकून, धमकावून व्हिडिओ बनवून घेतला. याशिवाय मला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची तसेच माझे दुकान बंद करण्याची धमकी दिली. त्यामुळे या गंभीर प्रकरणाची तातडीने दखल घेऊन या संपूर्ण प्रकारांची उच्चस्तरीय चौकशी होऊन सहाय्यक पोलीस आयुक्त गणेश बिरादार यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी सतीश काळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली.










Leave a Reply