Dighi news: प्रजासत्ताक दिनानिमित्त दिघीत दुचाकी रॅली

Dighi news: प्रजासत्ताक दिनानिमित्त दिघीत दुचाकी रॅली
Pckhabar- प्रजासत्ताक दिनानिमित्त दुचाकी रॅली काढून तिरंगा ध्वजास मानवंदना देण्यात आली. या दुचाकी रॅलीत दिघीतील विविध तरुण मंडळे, प्रतिष्ठान, संघटना व मित्र परिवार यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होतो.

भारत माता कि जय , जय जवान जय किसान , झाडे लावा झाडे जगवा , या घोषणा देत दिघीतील महत्वाच्या ठिक ठिकाणी ध्वजास मानवंदना देण्यात आली .

तसेच रॅलीची सांगता वृक्षरोपन करुन करण्यात आली. यावेळी नवग्रह मित्र मंडळ , आझाद मित्र मंडळ , झुंजार प्रतिष्ठाण , भिमाशंकर नगर मित्र मंडळ , शिव गणेश मोरया मित्र मंडळ आदि मंडळाच्या तरुणांनी सहभाग नोंदवला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *