Dehu news: देहूत स्वस्त जेनेरिक औषधी मेडिसिन स्टोअरचे उद्घाटन

Pckhabar- देहूगाव परिसरात प्रथमच
स्वस्त जेनेरिक औषधी मेडिसिन स्टोअरचे उद्घाटन भारतीय जनता पक्षाचे ओबीसी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष, माजी आमदार योगेश टिळेकर, माजी राज्यमंंत्री बाळा भेगडे, भाजपाचे पुणे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर करण्यात आले.
याप्रसंगी माजी नगरसेवक धनंजय आल्हाट, नगरसेविका सुवर्णा बुर्डे, आश्विनी जाधव, भाजपा पुणे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब काळोखे,
संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष
मधुकर महाराज मोरे, आखिल वारकरी संघटनेचे संपर्कप्रमुख जालिंदर महाराज काळोखे, देहूरोड कॅन्टोमेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष रघुवीर शेलार, माजी पंचायत समिती सदस्य सुहास गोलांडे, देहूरोड भाजपाचे शहराध्यक्ष बाळासाहेब शेलार,
माजी उपसरपंच स्वप्निल आप्पा काळोखे, भाजपाचे मावळ अध्यक्ष रविंद्र आप्पा भेगडे, युवा मोर्चा अध्यक्ष संदिप काकडे, प्रशांत आण्णा ढोरे, कृष्णा शंकर परंडवाल, संदिप परंडवाल, चंद्रशेखर परंडवाल, सुनिता टिळेकर, हेमाताई मोरे, रत्नमाला करंडे, सोनाली घोडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
भारतीय जनता पक्षाचे देहूगाव शहराध्यक्ष मच्छिंद्र परंडवाल आणि स्वस्त जेनेरिक औषधी मेडिसिन स्टोअरच्या संचालिका अरूणाताई मच्छिंद्र परंडवाल म्हणाल्या ”केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री जन औषधी या संकल्पनेवर आधारित देशभरात स्वस्त जेनेरिक औषधी स्टोअर सुरू आहेत. गोर-गरीब नागरिकांना याचा मोठ्या प्रमाणात लाभ होत आहे. देहूगाव आणि परिसरातील नागरिकांनाही स्वस्त जेनेरिक औषधे मिळावे या हेतूने देहूगावात प्रथमच स्वस्त जेनेरिक औषधांचे स्टोअर सुरू करण्यात आले आहे. नागरिकांनी याचा लाभ घ्यावा”, असे आवाहन अरूणाताई परंडवाल यांनी केले आहे.










Leave a Reply