Pimpri news: दरवाढ रोखण्यासाठी इंधन जीएसटीच्या कक्षेत आणावे

Pimpri news: दरवाढ रोखण्यासाठी इंधन जीएसटीच्या कक्षेत आणावे
Pckhabar- इंधन दरवाढीने नवा उच्चांक केला आहे. दररोज इंधन दरवाढ होत असून इतिहासात प्रथमच 90 च्या पुढे पेट्रोलचे दर झाले आहेत. येत्या काही दिवसात पेट्रोल शंभर रूपयांकडे जाते की काय? अशी शंका येत आहे. इंधन दरवाढीचा फटका सर्वच क्षेत्रावर होत आहे. त्यामुळे इंधन दरवाढ कमी करण्यासाठी एक्साईज ड्युटी कमी करून इंधन जीएसटीच्या (वस्तू व सेवा कर) कक्षात आणावे, अशी मागणी फेडरेशन ऑफ असोसिएशन्स ऑफ पिंपरी-चिंचवडने केली आहे.

याबाबत प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात फेडरेशन ऑफ असोसिएशन्स ऑफ पिंपरी-चिंचवडने म्हटले आहे की, कोरोनाच्या जागतिक महामारीने लघुउद्योगजकांवर मोठा परिणाम झाला आहे. सातत्याने होणारी इंधन दरवाढ, स्लिटमध्ये होणारी प्रचंड दरवाढ, वीजेमध्ये होणारी दरवाढ आणि खंडीत होणारा वीज पुरवठा याबाबींमुळे उद्योजक त्रस्त झाले आहेत. स्टिल, सिमेंट, लोखंडमध्ये झालेली दरवाढ मागे घ्यावी. इंधन दरवाढ कमी करण्यासाठी एक्साईज ड्युटी कमी करून इंधन जीएसटीच्या (वस्तू व सेवा कर) कक्षात आणावे, पुणे जिल्ह्यातील कार्गो विमानतळाची त्वरीत स्थापना करावी. एमआयडीसीतील उद्योग क्षेत्राला ’इंडस्ट्रिज टॉऊनशिपचा दर्जा’ जाहीर करावा. महावितरणची दरवाढ कमी करावी, अशा विविध मागण्या  फेडरेशन ऑफ असोसिएशन्स ऑफ पिंपरी-चिंचवडने केल्या आहेत. या मागण्याचा केंद्र आणि राज्य सरकारने सकारात्मक विचार करावा, अशी मागणी फेडरेशन ऑफ असोसिएशन्स ऑफ पिंपरी-चिंचवडचे अध्यक्ष गजानन बाबर, उपाध्यक्ष गोविंद पानसरे, कोषाध्यक्ष मधुकर गायकवाड यांनी केली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *