Talegaon Dabhade news: ‘थकीत पाणीपट्टीवरील व्याजाची रक्कम नगराध्यक्षाकडून वसूल करा’
Pckhabar- तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत नगराध्यक्षा आणि प्रशासनाच्या गलथान कारभारावर विरोधी पक्षासह काही सत्तारुड सदस्यांनी टीकेची झोड उठविली. तर दोन वर्षाची पाणीपट्टीची बिले नागरिकांना न देता त्यांना आकारण्यात आलेली दंड व्याजाची रक्कम नगराध्यक्षाकडून वसूल करा. अशी आग्रही मागणी सभागृहात करताच सभागृहात एकच खळबळ उडाली.
तळेगाव दाभाडे नगरपरिषदेची तहकूब सभा सोमवारी झाली.यावेळी नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, उपनगराध्यक्ष सुशील सैंदाणे, मुख्याधिकारी दीपक झिंजाड हे व्यासपिठावर होते.
मागील सभेचा वृत्तांत वाचून कायम करणे. या विषयावरच दोन दिवसात सभा कामकाज सुमारे १३ तास चालले.यावेळी नगराध्यक्षांनी काही चुकीचे ठराव केले. यावर आक्षेप घेऊन गटनेते किशोर भेगडे व विरोधी पक्षनेते गणेश काकडे यांनी ते रद्द काण्यासाठी आग्रह धरला.तर या पूर्वी झालेल्या सभांच्या ठरावाची प्रशासनाकडून अंमलबजावणी होत नसल्याबद्दल आणि नगराध्यक्षांची प्रशासनावर पकड नसल्याबद्दल खंत व्यक्त केली.
नगर परिषदेने सन २०१६-२०१७ व २०१७ -२०१८ या दोनवार्षाची पाणीपट्टीची बिले काही मालमत्ता धारकांना न देताच त्यांना थकीत मुद्दल व व्याज,दंडाची बिले पाठिण्यात आली आहे. त्याचा निषेध करून नगराध्यक्षांकडून या मालमत्ताधाराकांची व्याज, दंडाची रक्कम वसूल करावी. अशी मागणी लाऊन धरली.तर ५२ कोटी रुपये खर्चाच्या नव्याने होत असलेल्या निकृष्ट कामाबद्दल आक्षेप घेत चुकीच्या पध्दतीने चाललेली कामे त्वरित थांबावावित अशी मागणी करण्यात आली.
या सभेत सत्तारुड सभागृह नेते अमोल शेटे, अरुण भेगडे पाटील, निखील भगत, शोभा भेगडे,नीता काळोखे, कल्पना भोपळे, विभावरी दाभाडे, मंगल जाधव, संध्या भेगडे, काजल गटे तसेच जनसेवा विकास समितीचे रवींद्र आवारे, निखील भगत हेमलता खळदे, विरोधी पक्षनेते गणेश काकडे, गटनेते किशोर भेगडे, अरुण माने, संतोष भेगडे, वैशाली दाभाडे, मंगल भेगडे आदी नगरसेवकांनी यामध्ये सहभाग घेतला.










Leave a Reply