Chinchwad news: डॉ.गिरीश प्रभुणे यांना “पद्मश्री” जाहीर झाल्याबद्दल शहरवासीयांच्या वतीने महापौर, पदाधिकाऱ्यांकडून अभिनंदन

Chinchwad news: डॉ.गिरीश प्रभुणे यांना “पद्मश्री” जाहीर झाल्याबद्दल शहरवासीयांच्या वतीने महापौर, पदाधिकाऱ्यांकडून अभिनंदन
Pckhabar- भटक्या समाजातल्या मुलामुलींचे शिक्षण व कौशल्यविकास यासाठी आपले जीवन वेचणारे आणि आपल्या प्रभावी लेखनातून भटक्या -विमुक्तांच्या अपरिचित जगाचे वास्तव सातत्याने मांडणारे सामाजिक कार्यकर्ते डॉ. गिरीशजी प्रभुणे यांना केंद्र शासनाचा “पद्मश्री” पुरस्कार प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर झाला आहे. या पुरस्काराने पिंपरी चिंचवड शहराच्या नावलौकिकात एक वेगळीच भर पडली असून पद्मश्री पुरस्काराबद्दल डॉ. गिरीशजी प्रभुणे यांचे पिंपरी चिंचवड शहरवासीयांच्या वतीने महापौर उषा उर्फ माई ढोरे, आमदार लक्ष्मणभाऊ जगताप, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी प्रजासत्ताक दिनी अभिनंदन केले.

यावेळी, भाजप शहराध्यक्ष तथा आमदार महेशदादा लांडगे, माजी खासदार अमरजी साबळे, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, उपमहापौर केशव घोळवे, नगरसेवक शत्रूघ्न काटे, बाबू नायर, अमोल थोरात, मोरेश्वर शेडगे, राजू दुर्गे, नगरसेविका शारदा सोनवणे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

सामाजिक क्षेत्रात गिरीशजी प्रभुणे यांचे योगदान बहुमूल्य आहे. भटक्या -विमुक्त समाजाच्या विकासासाठी त्यांनी आयुष्य वेचले आहे. भटके -विमुक्त विकास परिषदेच्या माध्यमातून समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी ते अविरत कार्य करीत आहेत. वैदू, कैकाडी, पारधी इत्यादी समाजातील मुलांच्या कल्याणासाठी ते झटत असून चिंचवड येथील “पुनरुस्थान समरसता गुरुकुलम”मध्ये भटक्या समाजातील साडेतीनशे मुलामुलींचे शिक्षण व कौशल्यविकास यासाठी ते विशेष प्रयत्न करीत आहेत. त्यांनी आपल्या प्रभावी लेखनातून भटक्या समाजाचे अपरिचित वास्तव मांडले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *