Pimpri news: अन्… आयर्नमॅन पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांना रडू कोसळले!

 

Pimpri news: अन्… आयर्नमॅन पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांना रडू कोसळले!
Pckhabar-एका मुलीने आपल्या वडिलांच्या विरहात स्वतः केलेली ‘देवा घरचा बाबा’ ही कविता पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या समोर सादर केली आणि ‘आयर्नमॅन’ अशी ओळख असलेल्या आयुक्तांना रडू कोसळले.

ऋतुजा शांतीलाल पाटील (रा. पळशी, ता. माण, जि. सातारा) असे कविता सादर केलेल्या मुलीचे नाव आहे.

ऋतुजा लहान असताना तिच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर तिला आयुष्यात आलेल्या अनुभवांची मांडणी ‘झुळूक’ या पुस्तकात तिने केली आहे. तिने हे पुस्तक पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांना भेट दिले. त्यावेळी तिने ‘देवा घरचा बाबा’ या कवितेतून आपल्या भावनांना वाट करून दिली. ऋतुजाची कविता ऐकताना पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश भावुक झाले. त्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *