Pune news: कुणाच्या किती बायका, कुणाला किती मुलं होती, हे जाहीर करू का? अजित पवारांचा विरोधकांना इशारा

 

Pune news: कुणाच्या किती बायका,
कुणाला किती मुलं होती, हे जाहीर करू का? अजित पवारांंचा विरोधकांना इशारा

Pckhabar-धनंजय मुंडे यांनी करुणा शर्माबाबत जे सांगायचं होतं ते त्यांनी जाहीरपणे सांगितले आहे. विरोधकांनी उगीच फाटे फोडू नये. मग इतराच्या भानगडी बाहेर काढायला गेलं तर विषय खूप व लांब जाईल. कुणी काय काय लपवाछपवी केली, कुणाचे लग्न झाले होते, कुणाला किती मुलं होती. लग्न झालं होतं की नाही झालं, कुणाच्या किती बायका आणि कुणी किती मुलं लपवली आहेत हे काय आम्हाला ठाऊक नाही का? अशा बऱ्याच गोष्टी आहे, कशाला खोलात जाण्यास सांगत आहात, असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या स्टाईलने भाजप नेत्यांना जोरदार प्रत्युउत्तर दिले.

राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhanjay Munde) यांच्यावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेने तक्रार मागे घेतली आहे. मात्र, भाजपच्या नेत्यांनी दबावामुळे तक्रार मागे घेतली अशी टीका केली आहे. ‘आता जर इतरांच्या भानगडी बाहेर काढल्या तर विषय खूप लांब जाईल, कशाला खोलात जाण्यास सांगताय’, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांनी जोरदार टीका केली आहे.

अजित पवार यांनी पुणे जिल्हा नियोजन आढावा बैठक घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

आता विरोधक काय म्हणतील याचा नेम नाही. आधी भाजपच्या नेत्यांनी धनंजय मुंडे यांच्या प्रकरणाचं समर्थन केलं होतं. नंतर त्या महिलेनं तक्रार मागे घेतल्यामुळे तोंडघशी पडले. आता थातूरमातूर उत्तर दिली जात आहे. आणि त्यामध्ये लोकांची दिशाभूल केली जात आहे’ अशी टीका अजित पवार यांनी केली.

 
 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *