Nigdi news: धक्कादायक निगडीत १० मृत कावळे आढळले
Pckhabar- बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर निगडीतील स्किम नंबर १२ चिकन चौकात आज सकाळी दहा कावळे मृत आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.
राज्यातील काही शहरात बर्ड फ्लूची साथ आल्याने सर्वत्र सतर्कता बाळगली जात आहे. बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर निगडीत दहा कावळे मृत्यूमुखी पडल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत स्थानिक नागरिकांनी महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाला याची माहिती देण्यात आली आहे.
दरम्यान, हे कावळे कशाने मृत्यूमुखी पडले हे अद्याप कळू शकले नाही.










Leave a Reply