Wakad crime news: कोल्ड्रींगमधून गुंगीचे औषध देऊन महिलेने तरूणाला लुटले
Pckhabar- बंबल डेटींग अॅपवरून ओळख झालेल्या महिलेने कामाची गरज असल्याचे सांगून तरूणाला भेटायला बोलावून घेतले. भेटण्यास आलेल्या तरूणाला कोल्ड्रींगमधून गुंगीचे औषध देऊन बेशुध्द करत त्याच्या अंगावरील सोन्याची चैन, अंगठी, मोबाईल, रोकड असा दिड लाखांचा ऐवज लुटून नेला. ही घटना वाकड येथील एका हॉटेलमध्ये घडली.
याप्रकरणी आशिषकुमार बी (वय-30, रा. चेन्नई) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका अनोळखी महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी महिलेची बंबल डेटींग अॅपवरून ओळख झाली. दोघांमध्ये चॅटींगव्दारे बोलने झाल्यानंतर महिलेने कामाची गरज असल्याचे फिर्यादीला सांगितले. त्यानुसार महिलेने वाकड येथील एका हॉटेलमध्ये तरूणाला भेटण्यास बोलवून घेत कोल्ड्रींगमध्ये गुंगीचे औषध देवून बेशुध्द केले. त्याच्या अंगावरील 90 हजारांची सोन्याची चैन, 25 हजारांची अंगठी, एक मोबाईल आणि 15 हजारांची रोकड असा दिड लाखांचा ऐवज जबरदस्तीने लुटून महिलेने पलायन केले. शुध्दीत आल्यानंतर फिर्यादी यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत महिलेविरोधात तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक टि. एस भोगम तपास करत आहेत.
Wakad crime news: कोल्ड्रींगमधून गुंगीचे औषध देऊन महिलेने तरूणाला लुटले










Leave a Reply