Maval news: श्रीराम मंदिरासाठी
राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांच्याकडून दहा लाखांची देणगी
Pckhabar- अयोध्येतील श्रीराम मंदिर उभारणीसाठी मावळ विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांनी दहा लाख रुपयांची देणगी दिली. मावळातील प्रत्येकाने या अभियानात सहभागी होऊन राममंदिर निर्मितीसाठी आपले योगदान द्यावे, असे आवाहन शेळके यांनी मावळवासियांना केले आहे.
देणगीचा धनादेश त्यांनी राम जन्मभूमी तीर्थक्षेत्रचे जिल्हा संयोजक प्रदीप शामराव देसाई यांच्याकडे शासकीय विश्रामगृह, वडगाव मावळ येथे सुपूर्त केला. तसेच सर्व पक्ष मिळून एक कोटी रुपयांचा निधी या मंदिर उभारणीसाठी मावळ तालुक्यातून गोळा करण्याचा संकल्प आमदार शेळके यांनी केला.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस मावळ तालुका अध्यक्ष बबनराव भेगडे, जिल्हा परिषद सदस्य बाबुराव वायकर, विश्व हिंदू परिषद कार्याध्यक्ष धनाजी शिंदे, सहसंयोजक निधी अभियान संतोषभाऊ भेगडे पाटील, राष्ट्रवादी कार्याध्यक्ष दीपक हुलावळे, पुणे जिल्हा निधीप्रमुख रमेश लोणकर, अध्यक्ष बजरंग दल मावळ गोपीचंद महाराज कचरे, बजरंग दल संयोजक संदेश भेगडे, जिल्हा मंत्री अमित भेगडे, महेंद्र असवले, अमोल पगडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. या कार्याकरीता एवढा वैयक्तिक निधी देणारे शेळके हे राज्यातील पहिले आमदार असल्याचा दावा त्यांच्या समर्थकांनी केला आहे.










Leave a Reply