Pimpri news: प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रध्वजाची होणारी विटंबना रोखावी

 

 

Pimpri news: प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रध्वजाची होणारी विटंबना रोखावी  
Pckhabar-राष्ट्रध्वज म्हणजे राष्ट्राची अस्मिता. 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी या दिवशी अनेकजण राष्ट्रध्वज विकत घेऊन मोठ्या अभिमानाने मिरवतात.  मात्र हेच कागदी आणि प्लास्टिकचे छोटे-छोटे राष्ट्रध्वज त्याच दिवशी रस्त्यावर, कचर्‍यात किंवा गटारात पडलेले आढळतात. त्यामुळे प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाची अशा प्रकारे होणारी विटंबना रोखण्यासाठी प्रशासनाने योग्य ती पाऊले उचलावीत, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्यासह पोलीस प्रशासन आणि शहरातील विविध शाळांना निवेदन दिले आहे.  

यावेळी हिंदु जनजागृती समितीचे पराग गोखले यांनी बंदी असतांना बाजारात, तसेच ऑनलाईद्वारे तिरंगा मास्क विक्रीसाठी उपलब्ध आहेत. त्यावर कारवाई व्हावी, तसेच  राष्ट्रध्वज संहितेचे पालन होण्याविषयी मागणी केली.   प्लास्टिकचे ध्वज लवकर नष्टही होत नाहीत, त्यामुळे अनेक दिवस या राष्ट्रध्वजाची विटंबना पहावी लागते, तसेच ‘प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजांची विक्री करणे’, हे कायदाबाह्य ठरते. त्यामुळे यावर बंदी घालावी, अशीही मागणी यावेळी करण्यात आली.

या मागणीचे निवेदन  हिंदु जनजागृती समितीच्या वतीने  पिंपरी-चिंचवड येथे पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 चे मंचक इप्पर, पोलीस उप-आयुक्त श्री आनंद भोईटे परिमंडल 2, चिंचवड महानगरपालिका येथील शिक्षण मंडळाचे साहाय्यक प्रशासन अधिकारी पराग एकनाथ मुंढे, ज्योत्स्ना शिंदे, प्रशासकीय अधिकारी वर्ग 1, शिक्षण मंडळ, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, तसेच महापालिकाचे आयुक्त श्रावण हार्डिकर यांनाही निवेदन देण्यात आले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते रघुनाथ ढोबळे, शैलेश येवले आणि धर्माभिमानी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *