Bhosari news: प्रा. सदाशिव कांबळे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथमित्र पुरस्कार प्रदान Pckhabar- भोसरी येथील प्रितम-प्रकाश महाविद्यालयाचे प्राचार्य सदाशिव कांबळे यांना मराठी साहित्यातील ख्यातनाम लेखक व जेष्ठ समीक्षक आणि ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते
‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथमित्र’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
डेक्कन जिमखाना, पुणे येथे आज बंधुता साहित्य परिषद आणि काषाय प्रकाशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या भव्य समारंभात हा पुरस्कार समारंभ पार पडला. या समारंभाचे अध्यक्ष बंधुताचार्य प्रकाश रोकडे होते. या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून भगवान महावीर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. डॉ. अशोककुमार पगारिया होते. तसेच काषाय प्रकाशनचे प्रकाशक तथा जेष्ठ कवी चंद्रकांत वानखेडे उपस्थित होते या समारंभात स्वागताध्यक्ष म्हणून कवयित्री मधु श्री ओहाळ यांनी मान्यवरांचे स्वागत केले.
या भव्य समारंभात, “बधुता आणि संघर्ष ” डॉ. नयनचंद्र सरस्वते लिखीत पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या शानदार कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शंकर अथरे यांनी केले तर आभार विजयकुमार मर्लेचा यांनी मानले.










Leave a Reply