Pune news: सिरम इन्स्टिट्यूटमध्ये लागलेल्या आगीमध्ये 5 जणांचा मृत्यू
Pckhabar-पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटमध्ये लागलेल्या आगीमध्ये 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. त्या 5 जणांमध्ये 4 पुरूष आणि एका महिलेचा समावेश असल्याची धक्कादायक माहिती नुकतीच समोर आली आहे. त्यांना हडपसर येथील एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण त्यांचा मृत्यू झाला आहे.
सिरममध्ये आज दुपारी सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली होती. आग लागल्याचे समजताच पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, जिल्हाधिकारी राजेश देशमुख आणि इतर वरिष्ठ अधिकार्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पुणे मनपाच्या अग्नीशमन दलाचे वरिष्ठ अधिकारी तसेच 100 जवान घटनास्थळी दाखल झाले होते.










Leave a Reply