Pimpri news: भाजपा अनुसूचित जमाती, आदिवासी पदाधिकारी व कार्यसमीतीचा उद्या महामेळावा
Pckhabar-पिंपरी चिंचवड – भाजपा अनुसूचित जमाती /आदिवासी मोर्चाच्या वतीने उद्या शुक्रवारी प्रदेश पदाधिकारी, कार्य समिती बैठक व महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
भोसरीतील अंकुशराव लांडगे नाट्यगृहात
सकाळी 10.30 वाजता होणार आहे. भाजपा अनुसूचित जमाती मोर्चाचे प्रदेश पदाधिकारी, जिल्हा पदाधिकारी, तालुका पदाधिकारी, जनजाती खासदार, आमदार, जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका अध्यक्ष, सभापती, सदस्य, प्रदेश निमंत्रीत सदस्य यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश तथा आमदार डॉ. अशोक ऊईके यांनी केले आहे.
भाजपा अनुसूचित जमाती मोर्चाच्या कार्यसमीती बैठक व महामेळाव्याचे उदघाटन माजी मुख्यमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते होणार आहे. समारोप भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील करणार आहेत.
यावेळी भाजपा प्रदेश प्रभारी ओमप्रकाश धुर्वे, खासदार गिरीष बापट, भाजपा प्रदेश संघटनमंत्री विजय पुराणिक, भाजपा प्रदेश महामंत्री श्रीकांत भारतीय, भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा प्रदेशाध्यक्ष आमदार डॉ. अशोक ऊईके, खा. डॉ. भारतीताई पवार, खासदार डॉ. हिना गावित, खासदार अशोक नेते, पिंपरी चिंचवड भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे, चिंचवड विधानसभा आमदार लक्ष्मण जगताप, प्रदेशमंत्री तथा मा. आमदार संजय पुराम आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
तत्पूर्वी, सकाळी 10.00 वाजता प्रदेश पदाधिकारी, जनजाती खासदार, आमदार यांची बैठक होणार आहे. या बैठकीचे उदघाटन भाजपा राष्ट्रीय सचिव तथा भाजपा प्रदेश प्रभारी श्री. ओमप्रकाश धुर्वे यांचे हस्ते होणार आहे. यावेळी, प्रदेश संघटन महामंत्री श्री. विजय पुराणिक, भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा प्रदेशाध्यक्ष आमदार डॉ. अशोक ऊईके, प्रदेश महामंत्री श्री. श्रीकांतजी भारतीय, खासदार श्री. अशोक नेते, खासदार डॉ. हिनाताई गावित, जनजाती आमदार, प्रदेश पदाधिकारी खासदार डॉ. भारतीताई पवार उपस्थित राहणार आहेत. मेळाव्यात देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी, माजी मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या आदिवासी विकास कार्याबाबत अभिनंदन ठराव प्रदेश महामंत्री तथा भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा श्री. प्रकाश गेडाम हे ठेवणार आहेत. सुधारित कृषी विधेयक 2020 ठराव खासदार डॉ. भारती पवार ठेवणार आहेत. तर 15 नोव्हेंबर या भगवान बिरसा मुंडा जयंती दिवस राष्ट्रीय जनजाती गौरव दिवस घोषित करणे, सुट्टी जाहीर करणे व भारतरत्न पुरस्कार देणेबाबत ठराव खासदार श्री. अशोक नेते ठेवणार आहेत. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात होणार आहे.
या पत्रकार परिषदेत भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा प्रदेशाध्यक्ष आमदार डॉ. श्री अशोक ऊईके, शहराध्यक्ष तथा आमदार महेशदादा लांडगे, चिंचवड विधानसभा आमदार लक्ष्मणभाऊ जगताप, पिंपरी चिंचवड महानगरपालिका महापौर सौ. उषा उर्फ माई ढोरे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा प्रदेश महामंत्री श्री. प्रकाश गेडाम, भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा प्रदेश महामंत्री, श्री. एन.डी.गावित, प्रदेश उपाध्यक्ष सौ. उषाताई मुंडे, संघटन महामंत्री श्री. अमोल थोरात, भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा पुणे जिल्हाध्यक्ष श्री. महादेव काठे उपस्थित होते.










Leave a Reply