Maharashtra news: दहावी, बारावीच्या परिक्षेच्या तारखा जाहीर
Pckhabar-कोरोना संसर्गामुळे यंदाच्या शैक्षणिक वर्षात काही अडसर निर्माण झाले. मात्र, यावरही मात करुन यंदा दहावी (SSC) आणि बारावीच्या (HSC) परीक्षा नेहमीच्या पद्धतीनेच, परंतु काहीशा उशिराने घेतल्या जाणार आहेत. राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी इयत्ता १० वी आणि १२ वीच्या परीक्षांची तारीख अखेर आज जाहीर केली आहे.
इयत्ता १२ वी परीक्षा २३ एप्रिल ते २९ मे २०२१ या दरम्यान घेतली जाणार असून या परीक्षेचा निकाल जुलैच्या अखेरीस जाहीर केला जाईल”, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी आज दिली आहे. तर इयत्ता १० वीची परीक्षा २९ एप्रिल ते ३१ मे २०२१ च्या दरम्यान घेतली जाणार आहे. तर या परीक्षेचा निकाल ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस जाहीर केला जाईल, असं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं आहे.










Leave a Reply