Pimpri news: शहरात मीटरने रिक्षा सेवा सुरू
Pckhabar-पिंपरी-चिंचवड शहरात गुरूवारपासून मीटरने रिक्षा सेवा सुरू करण्यात आली आहे. या सेवेचे उद्घाटन पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या हस्ते करण्यात आले.
पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर रातराणी रिक्षा स्टँडवर रिक्षा मीटर डाऊन करुन या सेवेस प्रारंभ करण्यात आला. यावेळी पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश, अतिरिक्त पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त सुधीर हेरीमठ, मंचक इप्पर, सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीकांत दिसले, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आधे, सुबोध मेडसीकर, पोलीस निरीक्षक मिलिंद वाघमारे, राजेंद्र कुंटे, महाराष्ट्र रिक्षा पंचायतीचे अध्यक्ष बाबा कांबळे, आशा कांबळे, बाळासाहेब ढवळे, संजय दौडकर, धनंजय कुदळे आदी उपस्थित होते.
शहरातील नागरिक, ज्येष्ठ नागरिक, महिला प्रवासी संघटना यांनी पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांची भेट घेऊन मीटरने रिक्षा सुरू करण्याची मागणी केली होती. याबाबत कृष्ण प्रकाश यांनी वाहतूक विभागास शहरात मीटरने रिक्षा सुरू होण्या संदर्भात मीटरने रिक्षा सुरू कराव्यात असे आदेश दिले होते. त्यानुसार ही सेवा सुरू करण्यात आली आहे.
कृष्ण प्रकाश म्हणाले, आता आधुनिकरण आणि काळाच्या सुसंगत राहून रिक्षा चालकांनी स्वतः मध्ये बदल केले पाहिजे. नागरिकांनी मीटरने प्रवास करावा, मीटरने भाडे देण्यास नकार देऊ नये. प्रवाश्यांनी रिक्षा चालकांची तक्रार आमच्याकडे करावी. तक्रार असल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल. यावेळी वर्ड बुक ऑफ मध्ये नोंद झाल्याबद्दल आयुक्त कृष्ण प्रकाश यांचा महात्मा फुले यांची पगडी घालून बाबा कांबळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.










Leave a Reply