Pume news: नाद करा पण पुणेकरांचा कुठं…! जो बायडेन, कमला हॅरिस यांच्या अभिनंदनाचा झळकला बॅनर

Pume news: नाद करा पण पुणेकरांचा कुठं…! जो बायडेन, कमला हॅरिस यांच्या अभिनंदनाचा झळकला बॅनर

Pckhabar- डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव करत  जो बायडेन यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली तर भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांची अमेरिकेच्या उपाध्यक्षपदी निवड झाली. त्याचबरोबर बायडेन यांच्या मंत्रिमंडळात भारतीय वंशाच्या १२ मंत्र्यांची निवड झाली. भारतीयांसाठी ही कामगिरी नक्कीच अभिमानास्पद होती. याच गोष्टीचा अभिमान बाळगत पुण्यात याचे जंगी सेलिब्रेशन करण्यात आले आहे.

धनकवडी परिसरात जो बायडेन आणि कमला हॅरिस यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करणारा व अभिनंदनपर असा भला मोठा बॅनर झळकला आहे. हा बॅनर चर्चेचा विषय ठरला आहे.

 

पुण्यातील भारती विद्यापीठ समोर कमला हॅरिस आणि भारतीय वंशाच्या १२ मंत्र्यांचे अभिनंदन करणारा मोठा फलक झळकला आहे. आणि हा फलक ज्या व्यक्तीने लावला त्यांचे नाव आहे पोपटराव खोपडे. खोपडे यांनी लावलेल्या फ्लेक्स येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांचे आकर्षणाचे कारण ठरले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *