Pimpri News: ‘धन्वंतरी’ स्वास्थ योजना चालू ठेवण्यासाठी महापालिका कर्मचा-यांचे उपोषण
Pckhabar- पिंपरी-चिंचवड महापालिकेतील अधिकारी, कर्मचा-यांसाठी ‘धन्वंतरी स्वास्थ’ योजना चालू ठेवावी या मागणीसाठी महासंघाने उपोषण सुरु केले आहे. महापालिकेची आज (बुधवारी) कर्मचारी महासंघ, कर्मचारी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करत आहे.
महापालिका सेवेतील, सेवानिवृत्त कर्मचा-यांसाठी ‘धन्वंतरी स्वास्थ’ ही वैद्यकीय योजना 1 सप्टेंबर 2015 पासून लागू करण्यात आली होती. ही योजना कर्मचारी हिताची होती. परंतु, कर्मचारी, महासंघाचा विरोध डावलून प्रशासनाने महापालिका सेवेतील व सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी आणि त्यांच्यावर अवलंबितांसाठी ‘धन्वंतरी स्वास्थ’ योजनेऐवजी 4 जानेवारी पासून वैद्यकीय विमा योजना लागू केली आहे. त्याला विरोध करत महापालिकेच्या आऊट गेटसोमर पिंपरी-चिंचवड कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अंबर चिंचवडे यांच्या नेतृत्वाखाली उपोषण सुरु आहे.










Leave a Reply