Pimpri News: कोरोना लसीकरणाला अल्प प्रतिसाद, दिवसभरात 278 जणांनी घेतली लस

Pimpri News: कोरोना लसीकरणाला अल्प प्रतिसाद, दिवसभरात 278 जणांनी घेतली लस

Pckhabar- पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना लसीकरणाला वैद्यकीय क्षेत्रातील लोकांचा अल्प प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. आज मंगळवारी दिवसभरात 278 लाभार्थ्यांनी लस घेतली आहे. तर, शनिवारी 456 जणांनी लस घेतली होती. त्यातुलनेत आज लसीकरणाला अल्प प्रतिसाद मिळाला. दोन दिवसात शहरातील 734 जणांनी कोरोनाची लस घेतली आहे.

आज दिवसभरात यमुनानगर रुग्णालयात (31), नवीन जिजामाता रुग्णालय (6), नवीन भोसरी रुग्णालय (43), वायसीएम रुग्णालय (62), पिंपळेनिलख दवाखाना (39), कासारवाडी दवाखाना (38), तालेरा रुग्णालय (43) आणि ईएसआयएस रुग्णालयात 16 अशा 278 जणांनी आज लस घेतली आहे.

दरम्यान, वैद्यकीय क्षेत्रातील लोकांना पहिल्या टप्यात लस दिली जात आहे. लसीकरणासाठी वैद्यकीय क्षेत्रातील 18 हजार जणांची नोंद झाली आहे. पहिल्या टप्प्यात कोरोनाचे शहरासाठी 15 हजार डोस प्राप्त झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *