Dehu news: ‘खेळ रंगला पैठणीचा’ कार्यक्रमाला तुफान प्रतिसाद
अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांची उपस्थिती
Pckhabar- रसिकाताई स्वप्निल काळोखे यांच्या महालक्ष्मी महिला बचत गटाच्या माध्यमातून रविवारी आयोजित करण्यात आलेल्या ‘खेळ रंगला पैठणीचा’ या कार्यक्रमाला महिलांचा तुफान प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमासाठी प्रसिद्ध अभिनेत्री स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेतील येसुबाई राणीसाहेब फेम प्राजक्ता गायकवाड या प्रमुख पस्थित होत्या.
याप्रसंगी माजी राज्यमंत्री बाळा उर्फ संजय भेगडे यांच्या सौभाग्यवती सारिका ताई भेगडे, जिल्हा परिषद सदस्या शैलाताई खंडागळे, देहूगावच्या सरपंच पुनमताई काळोखे, प्रसिद्ध कीर्तनकार सुप्रिया ताई साठे ठाकूर पाटील, मावळ महिला आघाडीच्या सुनेत्राताई जाधव, मा. ग्रा. पं. सदस्य लीलाताई काळोखे, कीर्तनकार गौरीताई सांगळे उपस्थित होत्या.
खेळ रंगला पैठणीचा या कार्यक्रमासाठी सुमारे 900 महिला उपस्थित होत्या. 200 महिलांनी या खेळ रंगला पैठणीचा कार्यक्रमात सहभाग घेतला. त्यातील प्रथम क्रमांक सौ.राधिका फराकटे, द्वितीय सौ.दिपाली काळोखे, तृतीय क्रमांक सौ.जगताप ताई या महिलांनी पटकावला. त्यांना अनुक्रमे मानाची पैठणी व नथ, मिक्सर, फॅन या वस्तू मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला. लकी विनर मानसी गायकर, विद्या शेलार या ठरल्या.
देहूगावचे आदर्श उपसरपंच स्वप्नील आप्पा काळोखे यांच्या कुटुंबाच्या वतीने अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांचा भक्ती शक्ती शिल्प भेट देवून सन्मान करण्यात आला.
प्राजक्ता गायकवाड यांची मुलाखत व्याख्याते प्रा. प्रदिप कदम यांनी घेतली. अभिनय क्षेत्रातील प्रवास, प्रसंग आणि महाराणी येसूबाई यांचा इतिहास प्राजक्ता गायकवाड यांनी उलगडवला.
प्रसिद्ध कीर्तनकार सुप्रियाताई साठे-ठाकूर पाटील यांनी आपल्या मनोगतात स्वप्निल आप्पा आणि सौ.रसिका काळोखे यांच्या उपक्रमाचे मनापासून कौतुक केलं आणि महिलांना धन्यवाद दिले.
महाराष्ट्र वारकरी महामंडळ विश्वस्त जालिंदर महाराज काळोखे, सरपंच विकास दादा ठाकूर, माजी पंचायत समिती सदस्य बाळासाहेब काळोखे आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमादरम्यान डॉ. लीना सोनवणे, कुमारी शामराव मरगज यांचा कोरोना योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. शुभम गाडगे, सत्यवान सहाणे यांनी केले. तर आभार देहूगावचे आदर्श उपसरपंच स्वप्निल आप्पा काळोखे यांनी मानले.










Leave a Reply