Dighi news: हाफ पीच क्रिकेट स्पर्धेला सुरूवात
Pckhabar- दिघी येथे कै. बाळासाहेब देवकर यांच्या स्मरणार्थ हाफ पीच क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. याचे उद्घाटन दिघीगावचे माजी सरपंच साहेबराव वाळके आणि सामाजिक कार्यकर्ते शशिकांत टिंगरे यांच्या हस्ते. करण्यात आले.
या स्पर्धेत ५५ टिमने सहभाग घेतला असून ही स्पर्धा चार दिवस चालू राहणार आहे. दोन टिम मध्ये नाणेफेक करून बाळासाहेब देवकर क्रिकेट करडक स्पर्धेच्या सामन्याना सुरुवात करण्यात आली.यावेळी सामाजिक कार्यकर्ते वसंत रेंगडे युवकांना मार्गदर्शन करताना म्हणाले की,आजची तरुण पिढी ही मोबाईलवर रमत असताना अशा मैदानी स्वरूपाचे खेळाचे आयोजन झाले पाहिजे आणि युवकांनी स्पर्धेत भाग घेऊन आरोग्य बरोबर मानसिक स्वास्थ्य सुदृढ केले पाहिजे. काळाच्या ओघात याप्रकारच्या स्पर्धा किंवा. खेळ खेळले जात नाही हे भावी पिढीला घातक आहे. तरूणानी मोबाईल वरच्या गेम खेळण्यापेक्षा मैदानी खेळावर लक्ष केंद्रित केले पाहिजे.
याप्रसंगी माजी नगरसेवक चंद्रकांत वाळके, संदीप बिराजदार, वसंत इंगळे, अभिमन्यू दोरकर, प्रतिभा दोरकर,मनिषा जढर, अँड सोनाली घाडगे,केशव वाघमारे, रवि वाळके, मंगेश असवले, विजय बोयणे संभाजी काळे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन अमोल देवकर यांनी तर सूत्रसंचालन धनाजी खाडे आणि नयनी रूणवाल यांनी आभार मानले.










Leave a Reply