Talegaon Dabhade news: नगर परिषदेच्या उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक जाहीर
Pckhabar-तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम पीठासन अधिकारी नगराध्यक्षा चित्रा जगनाडे यांनी जाहीर केला असून हि निवडणूक येत्या गुरुवारी (दि.२१) जानेवारी रोजी होणार आहे.
नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा वैशाली दाभाडे यांनी दिल्याने रिक्तपदासाठी हि निवडणूक होत आहे.
उपनगराध्यक्ष पदासाठी इच्छूक उमेदवारांचे अर्ज दि. २१ जानेवारी रोजी सकाळी १० ते १२ वाजेपर्यंत मुख्याधिकारी स्वीकारतील. तर या अर्जांची छाननी पीठासन अधिकारी १२.०० ते १२ .१५ मिनिटामध्ये करणार आहेत. उमेदावारंना अर्ज मागे घेण्य करिता १२.१५ ते १२.३० हि वेळ देण्यात आली आहे. तर १२.३० वाजता हात उंचाऊन मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या निवडणुकीच्या प्रक्रियेचे व्हिडीओ चित्रीकरण करण्यात येणार आहे. या मध्ये दुपारी १२ वाजता विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
सध्या नगर परिषदेतील संख्याबळ २७ असून यामध्ये भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक १२, जनसेवा विकास समितीचे नगरसेवक ७, तर तळेगाव शहर सुधारणा व विकास समितीचे नगरसेवक ७ आहेत. या शिवाय नगराध्यक्ष हे पद भाजपाकडे आहे. अश्या प्रकारे त्रिशंकू पध्दतीने नगर परिषद कामकाज चालू आहे.
येत्या निवडणुकीत उपनगराध्यक्ष पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते. याबाबत राजकीय वर्तुळात तर्क वितर्क लढवले जात आहेत. गेल्या चार वर्षाच्या काळात भारतीय जनता पक्षाकडून प्रथम उपनगराध्यक्षपद सुनील शेळके यांच्याकडे होते. दुस-यांदा जनसेवा विकास समितीचे संग्राम काकडे यांची उपनगराध्यक्ष पदावर निवड झाली होती. त्यानंतर तळेगाव शहर सुधारणा व विकास समितीच्या वैशाली दाभाडे यांची या पदावर वर्णी लागली होती. या चार वर्षामध्ये तीनही गटांना उपनगराध्यक्ष पदाची संधी मिळाली आहे. यावेळी कोणाकडे उपनगराध्यक्षपद जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र या पदासाठी तीनही गटातील इच्छूक जोरदार प्रयत्नशील आहे.










Leave a Reply